अमेरिका : अमेरिकेतील ‘४-बी’ असो अथवा ‘बॉयसोबर’ हे केवळ ट्रेंड नाहीत. रूढार्थाने बंड अथवा क्रांतीच्या चौकटीतही त्याला बांधता येणार नाही, याचे कारण केवळ प्रस्थापित व्यवस्था उलथवून टाकण्यापुरता त्यांचा उद्देश मर्यादित नाही. शोषक व्यवस्थेप्रतीची नाराजी व्यक्त करत आत्मशोधाच्या दिशेनं टाकण्यात आलेलं ते एक पाऊल आहे.