6 Pilgrims Killed In Fire : हिंदू उत्सवादरम्यान लागलेल्या आगीत होरपळून 6 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू; तर 7 जण गंभीर जखमी

6 Pilgrims Killed In Fire : या भीषण घटनेत 7 जण जखमी झाले आहेत. ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
6 Pilgrims Killed In Fire
6 Pilgrims Killed In FireEsakal
Updated on

6 Pilgrims Killed In Fire : मॉरिशसमध्ये काल (रविवारी) एका धार्मिक विधीदरम्यान लागलेल्या आगीत सहा यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मॉरिशस पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिवरात्रीच्या आधी एका उत्सवादरम्यान ही भीषण दुर्घटना झाली.

पोलीस आयुक्त अनिल कुमार दीप यांनी माहिती देताना सांगितले की, हिंदू देवतांच्या मूर्ती दाखवणाऱ्या लाकडी आणि बांबूच्या गाडीला आग लागली. विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने आग लागली.

पोलिस आयुक्त अनिल कुमार दीप यांनी सांगितले की, या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पूर्व आफ्रिकन बेट राष्ट्रातील हिंदू समुदायाकडून पवित्र मानल्या जाणाऱ्या शिवरात्री उत्सवापूर्वी यात्रेकरू ग्रँड बेसिन तलावाकडे पायी जात होते. त्यावेळी हि घटना घडली.

6 Pilgrims Killed In Fire
Pakistan New Prime Minister: पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पुन्हा शेहबाज शरीफ, 'इतक्या' मतांनी जिंकली निवडणूक

शिवरात्री ८ मार्चला

कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यात महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री शुक्रवार, ८ मार्च रोजी आहे. या वर्षी महाशिवरात्रीला अनेक शुभ योग (शुभयोग) घडणार आहेत. महाशिवरात्री श्रावण नक्षत्रात येत असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, सिद्धयोगासोबतच सिद्ध योगही तयार होत आहे. या शुभ संयोगांचा काही राशींवर खूप चांगला प्रभाव पडणार आहे.

6 Pilgrims Killed In Fire
Indian Dancer shot dead in US: भारतीय क्लासिकल डान्सरची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या; ४ दिवसांनंतरही तपासाबाबत माहिती नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.