Sri Lanka Car Racing Accident: श्रीलंकेत कार रेसिंगमध्ये भीषण दुर्घटना; लहान मुलासह ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू तर २३ जण जखमी

Sri Lanka Car Racing Accident: श्रीलंकेच्या उवा प्रांतात रविवारी मोटार कार रेसिंग स्पर्धेदरम्यान मोठा अपघात झाला आहे. यादरम्यान एका कारने प्रेक्षकांना चिरडलं. या अपघातात एका लहान मुलासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान 23 जण गंभीर जखमी झाले आहेत.
Sri Lanka Car Racing Accident
Sri Lanka Car Racing AccidentEsakal
Updated on

श्रीलंकेच्या उवा प्रांतात रविवारी मोटार कार रेसिंग स्पर्धेदरम्यान मोठा अपघात झाला आहे. यादरम्यान एका कारने प्रेक्षकांना चिरडलं. या अपघातात एका लहान मुलासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान 23 जण गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दियाथलावा येथील सेंट्रल हिल रिसॉर्टमध्ये रेसिंग इव्हेंटचे आयोजन केले जात असताना हा अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत.

या अपघातात 23 जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस प्रवक्ते निहाल थलदुवा यांनी सांगितले की, मृतांमध्ये आठ वर्षांचा मुलगा आणि चार ट्रॅक असिस्टंटचा समावेश आहे. एकूण 23 जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sri Lanka Car Racing Accident
Rajasthan Accident: लग्न सोहळा पार पाडून परतत होते; भरधाव ट्रकने व्हॅनला दिली धडक, 9 तरुणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, काल (रविवारी २१ एप्रिल) ही दुर्घटना घडली आहे. उवा प्रांत येथे एक कार रेसिंग स्पर्धा सुरू होती. यामध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा सुरू झाल्यानंतर एका कारने अचानक आपला ट्रॅक बदलला. त्यानंतर चालकाचे कारवरी नियंत्रण सुटले आणि कार अनियंत्रीत झाली. ट्रॅक बदलून कार थेट प्रेक्षकांमध्ये शिरली आणि हा अपघात झाला.

Sri Lanka Car Racing Accident
Nalasopara: नालासोपाऱ्यात तीन मजली इमारतीचा भाग कोसळला; जाणून घ्या काय आहे घटना

कार आपल्या दिशेने येत असल्याचं पाहून घटनास्थळी मोठी पळापळ झाली. या दुर्घटनेत ७ व्यक्तींचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह वैद्याकीय सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

साल २०१९ आधी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जात होती. कोरोनानंतर यंदा श्रीलंकाई सेनाकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. ही गर्दी जवळपास १ लाखांहून अधिक व्यक्तींची होती.

Sri Lanka Car Racing Accident
Dharashiv Accident News : वराडी टेम्पो व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन दहा जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.