Germany Shooting : चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार; हल्ल्यात सात ठार, आठ जण जखमी

जर्मनीतील हॅम्बुर्ग (Germany Hamburg) शहरात बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे.
Germany Hamburg
Germany Hamburgesakal
Updated on
Summary

वृत्तसंस्था रॉयटर्सनं फोकस ऑनलाइन मीडियाच्या हवाल्यानं ही माहिती दिलीये.

बर्लिन : जर्मनीतील हॅम्बुर्ग (Germany Hamburg) शहरात बंदूकधाऱ्यांनी अंदाधुंद गोळीबार केला असून त्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

वृत्तसंस्था रॉयटर्सनं फोकस ऑनलाइन मीडियाच्या हवाल्यानं ही माहिती दिलीये. फोकस मीडियाच्या वृत्तानुसार, हा गोळीबार उत्तर जर्मन शहर हॅम्बुर्गमध्ये झाला. या गोळीबारात सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

पोलीस (Hamburg Police) घटनास्थळी पोहोचून मोठी कारवाई करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅम्बुर्ग शहरातील एका चर्चमध्ये हा हल्ला झाला. हा हल्ला कोणत्या उद्देशानं करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

गोळीबारात सात ठार, आठ जखमी

वृत्तसंस्था रॉयटर्सनं बिल्ड वृत्तपत्राच्या हवाल्यानं म्हटलंय की, गोळीबारात सात जण ठार झाले, तर आठ जण जखमी झाले आहेत. जेहोवाज विटनेस चर्चमध्ये हा गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.

Germany Hamburg
Xi Jinping : बलाढ्य चीनची ताकद आणखी वाढणार; सलग तिसऱ्यांदा शी जिनपिंग बनले 'राष्ट्राध्यक्ष'

या घटनेनंतर गुन्हेगार पसार झाले आहेत. हॅम्बुर्ग पोलिसांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. गोळीबार झालेल्या अल्स्टरडॉर्फ जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई सुरू आहे. मात्र, या घटनेची अधिक माहिती पोलिसांनी दिलेली नाही. घटनास्थळी आपत्कालीन सेवा आणि डॉक्टर पोहोचले आहेत.

Germany Hamburg
Shiv Sena : त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही; राज ठाकरेंच्या 'मनसे'ची राऊतांनी काढली लायकी

गेल्या काही वर्षांत अनेक गोळीबारामुळं जर्मनी हादरलं आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये बंदुकधारी व्यक्तीनं स्वत: आणि त्याच्या आईची हत्या करण्यापूर्वी हनाऊ या पश्चिमेकडील शहरात तुर्कीमधील स्थलांतरितांसह नऊ जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.