Iran Blast: इराणमध्ये बॉम्बस्फोटात 103 ठार! सुलेमानींच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अफरातफर

इराणच्या सरकारी मीडियानं हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे.
West Bengal Factory Blast
West Bengal Factory Blastesakal
Updated on

दुबई : इराणचे दिवंगत जनरल कासेम सुलेमानी यांच्या हत्येच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात एकापाठोपाठ दोन भीषण बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये किमान 103 जण ठार झाले आहेत. इराणच्या सरकारी मीडियानं हा दहशतवादी हल्ल्या असल्याचं म्हटलं आहे. (103 killed in blasts near Iranian Guards commanders tomb during ceremony)

सुलेमानींच्या स्मृतीदिनानिमित्त जमलेल्या गर्दीवर हल्ला

कालच बैरूत इथल्या ड्रोन हल्ल्यात इराण समर्थक हमासचा बंडखोर सालेह अल-अरुरी मारला गेला होता. यामुळं मध्यपूर्वेत तणाव वाढला होता. हा हल्ला इस्रायलनं घडवून आणल्याचा आरोप लेबनीज अधिकाऱ्यांनी केला होता. यानंतर आज इराणचे दिवंगत जनरल कासेम सुलेमानी यांचं मूळ गाव केरमानमधील साहेब अल-जमान मशिदीजवळ हे स्फोट झाले आहेत. बगदाद विमानतळाच्या बाहेर अमेरिकन ड्रोन हल्ल्यात सुलेमानी यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे समर्थक एकत्र आलेले असताना हे स्फोट झाले.

West Bengal Factory Blast
Jitendra Awhad: "राम बहुजनांचे ते मांसाहारी होते"; जितेंद्र आव्हाडांचा वादग्रस्त दावा

दहशतवादी हल्ला

दरम्यान, केरमनचे डेप्युटी गव्हर्नर म्हणाले की, हा स्फोट म्हणजे 'दहशतवादी हल्ला' होता. या बॉम्बस्फोटांमध्ये किमान 170 लोक जखमी झाले आहेत, असं सरकारी मीडियानं सांगितलं आहे. इराणच्या तस्नीम या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, घटनास्थळी दोन पिशव्यांमधून बॉम्ब आणण्यात आले होते. या घटनेतील गुन्हेगारांनी रिमोट कंट्रोलने बॉम्बचा स्फोट केला, असा दावा तस्नीमनं केला आहे. (Latest Marathi News)

West Bengal Factory Blast
Video: कुनो नॅशनल पार्कमधून आनंद वार्ता! आशा मादी चित्त्यानं दिला तीन बछड्यांना जन्म

एकामागून एक स्फोट

ISNA या वृत्तसंस्थेनं केरमनचे महापौर सईद तबरीझी यांच्या हवाल्यानं सांगितले की, 10 मिनिटांच्या अंतरानं बॉम्बचा स्फोट झाला. ऑनलाइन फुटेजमध्ये सुरक्षा कर्मचार्‍यांनी परिसराला वेढा घातल्यानंतर लोक पळून जाण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. सरकारी दूरचित्रवाणीवरील प्रतिमांमध्ये परिसरात अनेक रुग्णवाहिका आणि बचाव कर्मचारी दिसत आहेत. (Marathi Tajya Batmya)

West Bengal Factory Blast
Uddhav Thackeray : "तेव्हा फडणवीसांना सरकार पाडण्याची दिली होती धमकी"; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

कोण होते सुलेमानी?

सुलेमानी कुड्स फोर्सचे प्रमुख होते. ते इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सची विदेशी शाखा, मध्य पूर्वेतील लष्करी ऑपरेशन्सची देखरेख करत होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी त्यांना जिवंत असतानाच 'जिवंत शहीद' असं घोषित केलं होतं. इराक आणि सीरिया या दोन्ही ठिकाणी इस्लामिक स्टेट जिहादी गटाला आव्हान देत सुलेमानी यांनी पराभव केला होता यासाठी त्यांना नायक म्हणून ओळखलं जातं होतं.

West Bengal Factory Blast
Nitish Kumar: नितीश कुमारांची लवकरच होणार इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी नियुक्तीची घोषणा - सूत्र

अमेरिकेनं शत्रू म्हणूनच पाहिलं

अमेरिकेसह त्यांच्या मित्र राष्ट्रांनी सुलेमानी यांना कायमच शत्रू म्हणून पाहिलं. सुलेमानी हा संपूर्ण प्रदेशातील सर्वात महत्त्वाचा पॉवरब्रोकर होता. त्यानं सीरिया, इराक आणि येमेनमध्ये इराणचा राजकीय आणि लष्करी अजेंडा सेट केला. 2020 मध्ये त्याच्या मृत्यूनंतर आणि कर्मनमध्ये त्याच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो लोक राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेनं एकत्र आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.