Omicron मुळे चिंता वाढली, UK मध्ये एका दिवसात ७८,६१० कोरोना रुग्णांची नोंद

Corona
Coronae sakal
Updated on

सध्या जगावर ओमिक्रॉनच्या (Omicron) नव्या व्हेरियंटचं संकट आहे. त्यातच ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनमुळे पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. युनायटेड किंगडममध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून बुधवारी सर्वाधिक कोरोना रुग्णांची (UK Corona Cases) नोंद करण्यात आली. सुमारे 78,610 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले असून ही संख्या जानेवारीमध्ये नोंदवलेल्या रुग्णांपेक्षा १० हजाराने जास्त आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Corona
ओमिक्रॉन बधितांसाठी हजार बेड्स आरक्षित; मुख्य रुग्णालयांसह जम्बो सेंटर सज्ज

ब्रिटनमध्ये नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने धुमाकळू घातला आहे. याचठिकाणी ओमिक्रॉनच्या पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ही कोरोनाची नवी लाट असल्याचा इशारा दिला आहे. सुमारे 67 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या युनायटेड किंगडममध्ये आतापर्यंत ११ दशलक्षाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.येत्या काही आठवड्यांत रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, असे ब्रिटीश आरोग्य प्रमुखाने सांगितले आहे. तसेच या लाटेत सर्वाधिक धोका असू शकतो. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पाहिली असता संक्रमणाचा धोका अधिक आहे, असे यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीचे मुख्य कार्यकारी जेनी हॅरी यांनी म्हटले होते.

१० हजाराहून अधिक ओमिक्रॉनचे रुग्ण -

विशषेतः लंडन आणि मँचेस्टरमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर लक्षणीय आहे. आतापर्यंत ओमिक्रॉनचे एकूण १० हजाराहून अधिक रुग्ण नोंदवण्यात आले असून जवळपास १० रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

भारतातील ओमिक्रॉनची स्थिती -

भारतात देखील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढत असून आतापर्यंत ४० च्या वरून रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक, दिल्ली, आंध्रप्रदेश, चंदीगढ या राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांच्या निम्मे रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.