यमनची राजधानी साना येथे एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत ७८ लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत १३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. (85 Killed Hundreds Injured In Stampede During Yemen Charity Event)
राजधानीत बुधवारी रात्री उशिरा आर्थिक मदत वितरीत करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हुथी-चालित गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सानाच्या मध्यभागी असलेल्या जुन्या शहरात शेकडो गरीब लोक व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जमले असताना चेंगराचेंगरी झाली.
मात्र, या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन करण्यात आलं नाही. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बंडखोरांचे ब्रिगेडियर अब्देल खलीक अल अघरी यांनी सांगितलं.
दरम्यान, या घटनेनंतर ज्या शाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, ती शाळा तात्काळ बंद करण्यात आली आहे. पत्रकारांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी गर्दी प्रचंड झाली होती. त्यामुळे जमावाला नियंत्रित करण्यासाठी सशस्त्र हुती बंडखोरांनी हवेत गोळीबार केला होता.
गोळी एका विजेच्या तारेला लागली. त्यामुळे स्फोट झाला. या घटनेमुळे लोक घाबरले. त्यांच्यात दहशत निर्माण झाली आणि एकच पळापळ सुरू झाली. त्यामुळे ही घटना घडल्याचं, प्रत्यक्षदर्शी अब्देल रहमान अहमद आणि याहिया मोहसीन यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.