US Air Strike : अमेरिकेचा सीरियामधील इराणी तळांवर हवाई हल्ला, 9 जण ठार; दोन आठवड्यातील दुसरी घटना

सीरियामध्ये असलेल्या अमेरिकेच्या बेस कॅम्पवर इराणी समूहामार्फत हल्ले केले जात होते. याला अमेरिकेने प्रत्युत्तर दिलं आहे.
US Air Strike
US Air StrikeeSakal
Updated on

एकीकडे इस्राइल-हमास युद्ध सुरू असताना, दुसरीकडे इराण-अमेरिकामधील तणाव आणखी वाढला आहे. सीरियामध्ये असलेल्या अमेरिकेच्या बेस कॅम्पवर इराणी समूहामार्फत हल्ले केले जात होते. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने पूर्व सीरियामध्ये एअर स्ट्राईक केले. यामध्ये इराणी समूहातील सुमारे 9 लोक मारले गेले असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या दोन आठवड्यांमध्ये दुसऱ्यांना अमेरिकेने सीरियामध्ये एअर स्ट्राईक केले आहेत. हे दोन्ही हल्ले इराण-संबंधित ठिकाणांवर करण्यात आले आहेत. हे हल्ले इराणी रिव्होल्युशनरी गार्ड या संघटनेच्या हत्यारांच्या गोदामावर केले असल्याचं स्पष्ट झालं आहे.

US Air Strike
Israel Army in Gaza City : "हमासला संपवूनच मागे फिरणार"; गाझा शहरापर्यंत पोहोचलं इस्राइलचं सैन्य

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांंनी याबाबत माहिती दिली. अमेरिका आपल्या सैनिकांच्या हितासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते, हे आम्ही यातून सिद्ध केलं आहे; असं ते म्हणाले.

17 ऑक्टोबरपासून अमेरिकेच्या आर्मी बेसवर हल्ल्याच्या कमीत कमी 40 घटना घडल्या आहेत. इस्राइल-हमास युद्धाचं रुपांतर प्रादेशिक लढाईमध्ये करण्याचा इराण आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र, हे प्रयत्न हाणून पाडण्याच्या उद्देशानेच अमेरिका इराण-समर्थित बेसवर हल्ला करत आहे.

US Air Strike
Israel-Hamas War : इस्राइल देणार एक लाख भारतीय बांधकाम कामगारांना नोकरी; पॅलेस्टिनी कामगारांच्या जागा भरणार - रिपोर्ट

इस्लामिक-स्टेट या दहशतवादी संघटनेला रोखण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये सुमारे 2,500 सैनिक तैनात केले आहेत. तसंच सीरियामध्ये देखील अमेरिकेचे 900 सैनिक आहेत. या सैनिकांवर गेल्या काही दिवसांत हल्ले वाढले आहेत. (Global News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()