म्यानमार लष्कराच्या दडपशाहीत ९१ ठार

Myanmar-Agitation
Myanmar-Agitation
Updated on

यंगून - म्यानमारमध्ये लष्कराची दडपशाही सुरूच असून आज देशभर वार्षिक सशस्त्र सेनादल दिन साजरा केला जात असतानाच विविध ठिकाणांवर लष्कर आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत ९१ पेक्षाही अधिक लोक मारल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

सध्या काही संशोधक आणि मानवी हक्कांचे अभ्यासक हे म्यानमारमधील चकमकीमध्ये ठार झालेल्यांची माहिती गोळा करत असून शनिवार दुपारपर्यंत हा आकडा ७४ पर्यंत गेल्याचे समजते. म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरोधात १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य जनेतेने आंदोलन करायला सुरुवात केली होती. तेथील लष्कराने देखील पहिल्या दिवसापासूनच आंदोलकांची मुस्कटदाबी करायला सुरुवात केली आहे. आजचा दिवस सर्वाधिक हिंसक होता. विविध ठिकाणांवर साठपेक्षाही अधिक लोक मारल्या गेले असून आतापर्यंत या आंदोलनामध्ये मरण पावलेल्यांची संख्या चारशेवर पोचल्याची माहिती सूत्रांनी दिली. तेथील लष्कराने १ फेब्रुवारी रोजी लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांचे लोकनिर्वाचित सरकार उलथवून टाकताना सगळी सत्ताच हातात घेतली होती. त्या दिवसापासून म्यानमारमध्ये आंदोलनाचा वणवा पेटला असून लष्कर मात्र निर्दयीपणे हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 

म्यानमारचे तीन जखमी नागरिक भारतात
गुवाहाटी : म्यानमारच्या लष्करी राजवटीला कंटाळून असंख्य नागरिक देश सोडून जात असून भारताच्या आश्रयाला येत आहेत. काल गोळीबारात जखमी झालेले तीन नागरिक सीमेपलीकडून भारतात पोचले. त्यांना दवाखान्यात दाखल केले आहे. पोलिस अधिकारी विक्रमजी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारच्या सीमाभागात तामू भागात म्यानमारच्या पोलिसांनी गोळीबार केला. त्यानंतर गुरुवारी रात्री डझनभर नागरिक सीमा ओलांडून मणिपूरला आले. त्यापैकी आठ नागरिकांना परत पाठवण्यात आले असून तीन जणांना मानवतेच्या दृष्टीने दवाखान्यात दाखल केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.