नवी दिल्लीः आई होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची अनुभूती असते. बाळासाठी स्त्री ९ महिने प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करते. नको तो त्रास सहन करते. कारण बाळंतपण हा तिच्यासाठी अविस्मरणीय क्षण असतो. परंतु ६१ वर्षे बाळ गर्भात राहिल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का? मात्र असं घडलं आहे.
चीनची एक महिला हुआंग यीजुन हिने ९२ व्या वर्षी बाळाला जन्म दिला. परंतु जेव्हा डॉक्टरांनी बाळ बघितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण ते बाळ दगडाचं होतं. १९४८मध्ये सदरील महिला ३१ वर्षांची होती. तेव्हा ती प्रेग्नंट राहिली. त्यानंतर मात्र तिने ६१ वर्षे बाळाला गर्भातच ठेवलं.
प्रेग्नंट राहिल्याचं कळल्यानंतर हुआंग खूश झाली होती. परंतु डॉक्टरांनी तिला तिची एक्टोपिक प्रेग्नंसी असल्याचं सांगितलं, तेव्हा ती दुःखी झाली. अशा केसमध्ये फर्टिलाइज एग आईच्या गर्भाला चिटकू शकत नाहीत. त्यामुळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात.
अशा प्रेग्नंसीमध्ये बाळांमध्ये दोष असतात. एमनियोटिक द्रव नसणं आणि गर्भात बाळाच्या तुलनेत द्रवाचा दबाव जास्त असणं धोक्याचं असतं. हुआंगच्या केसमध्ये बाळ जिवंत राहिलं नाही. परंतु बाळाचं शरीर एवढं मोठं झालं की, ते पोटातून बाहेर येणं शक्य झालं नाही.
डॉक्टरांनी तिला भ्रूण काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, कारण ते ठेवल्यास नंतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. दुर्दैवाने, शस्त्रक्रियेचा खर्च तिच्या कुटुंबासाठी खूप जास्त होता. हुआंगने ऑपरेशनकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला. एका डॉक्टरने एनबीसी न्यूजला सांगितले की, अशा परिस्थितीत, जेव्हा बाळाचे शरीर नैसर्गिकरित्या बाहेर काढण्यासाठी अवघड होते तेव्हा मृत अर्भकाभोवती कॅल्शियम तयार होते.
यामुळेच 'स्टोन बेबी' तयार होते. असं स्टोन बेबी शरीरात २२ वर्षे राहू शकतं. हे असतांना दुसऱ्या बाळालाही जन्म देता येतो, असं डॉक्टर सांगतात. हुआंगला 'चाईल्ड ऑफ स्टोन' माहिती होती. पण ते काढणे तिला परवडणारे नव्हते, शेवटी वयाच्या 92 व्या वर्षी तिच्यावर शस्त्रक्रिया झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.