सहसा एकाच कंपनीत नोकरी करायला लोक त्रासतात. मात्र एका वॉल्टर ऑर्थमन नावाच्या व्यक्तीने चक्क एकाच कंपनीत 84 वर्षे काम केले आहे. ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स (Guinness World Records) मध्येही करण्यात आली आहे. या व्यक्तीचे वय शंभर वर्षे असून त्यांनी जगावेगळा रेकॉर्ड केलाय. (a old man has broken the guinness world record for the longest time 84 years worked at one company)
सहसा एकच काम करुन अनेक जण कंटाळत असतात. मात्र अशा लोकांना वॉल्टर ऑर्थमन यांनी आश्चर्यचकीत केले आहे. जॉब म्हटले की निवृत्ती ही आली. ही निवृत्ती घेण्याचे वयही ठरलेले असते. असे असले तरी काही लोक मात्र ज्या पद्धीतने नोकरी करतात ते पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. यातलचं उदाहरण म्हणजे वॉल्टर ऑर्थमन.
वॉल्टर ऑर्थमन हे सध्या 100 वर्षांचे आहेत. त्यांच्या या कामगिरीची नोंद गिनिज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये करण्यात आली आहे वॉल्टर ऑर्थमनी ब्राझीलमधील एका टेक्सटाईल कंपनीत 80 वर्षांहून अधिक काळापासून काम करत आहेत. एका सेल्स मॅनेजरच्या नावावर एकाच कंपनीत सर्वाधिक काळ त्यांनी नोकरी करत विक्रम केलाय.
100 वर्षांचे वॉर्टल यांनी इंडस्ट्रियाज रीनॉक्स एसएमध्ये एक शिपींग असिस्टंट म्हणून काम सुरु केले. दरम्यानच्या काळात कंपनीने नाव बदलून रीनॉक्सव्यू (RenauxView) असेही करण्यात आले. सध्या त्यांच्या या विक्रमाची सर्वत्र चर्चा सुरु असून सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.