Russia | रशियाचे १३ हजार ५०० सैनिक मारले गेले, युक्रेनने जाहीर केली आकडेवारी

रशिया-युक्रेन युद्धाला २० दिवस होत आहेत. मात्र युद्ध थांबताना दिसत नाही.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarRussia Ukraine War
Updated on

किव्ह : रशिया-युक्रेन युद्धाला २० दिवस होत आहेत. मात्र युद्ध थांबताना दिसत नाही. यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. २० लाख युक्रेनमधील नागरिकांनी देश सोडला आहे. रशियाकडून रुग्णालये, रहिवाशी भागांवर हल्ले सुरुच आहेत. युक्रेनच्या (Ukraine) परराष्ट्र मंत्रालयाने युद्धातील रशियाचे (Russia) लष्करी नुकसानीची आकडेवारी ट्विट करुन जाहीर केली आहे. ट्विटनुसार युक्रेनमध्ये १३ हजार ५०० रशियाचे सैनिक मारले गेले असून १ हजार २७९ लष्करी वाहने नष्ट केली गेली. ८१ विमाने, १५० तोफा, ९५ हेलिकाॅप्टर, ६४ एमएसआरएस, ४०४ रणगाडे, ६४० वाहने, ६० पाणीटँकर, ३ जहाजे, ९ युएव्ही, ३६ विमान विरोधी यंत्रणा आदी नष्ट करण्यात आले आहेत. (Above 13 Thousand Russian Soldiers Died In War, Says Ukrainian Foreign Ministry)

Russia Ukraine War
अमेरिका खोटी माहिती पसरवत आहे; चीनचा गंभीर आरोप

रशिया अडचणीत

अमेरिका व ब्रिटनच्या संरक्षण तज्ज्ञांच्या दाव्यानुसार रशियाकडे १० ते १४ दिवस पुरेल एवढाच शस्त्रसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे युद्ध कसे सुरु ठेवायचे असा प्रश्न रशियासमोर उभा ठाकला आहे. मात्र या संकट काळात चीन रशियाच्या मदतीला धावून आला आहे. चीन (China) त्या देशाला पैसा आणि शस्त्रसाठ्याची मदत करणार आहे. मात्र यापूर्वीच अमेरिकेने चीनला रशियास मदत करु नये सांगितले आहे. जर मदत केल्यास परिणामांना सामोरे जावे लागले असा इशारा देण्यात आला आहे.

Russia Ukraine War
कोरोनाची दहशत ! चीनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीला ५ अब्ज डाॅलरचा फटका

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी जखमी सैनिकांची घेतली भेट

युक्रेनची राजधानी किव्हमधील एका रुग्णालयातील जखमी युक्रेनियन सैनिकांची राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी काही सैनिकांबरोबर छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहेत. या प्रसंगी बोलताना झेलेन्स्की सैनिकांना म्हणाले, की तुम्ही लवकर बरे व्हा ! आपण युद्ध जिंकणारच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()