Abraham Lincoln: अमेरिकेत अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा वितळला; कराचीत उष्मघाताने शेकडो बळी

जगभरात जाणवतोय उष्णेताचा कहर
Abraham Lincoln Wax Statue
Abraham Lincoln Wax Statue

वॉशिंग्टन : उष्णतेच्या लाटेने बहुतांश देशांतील नागरिक घामाघूम झालेले असताना त्याचा फटका निर्जीव वस्तूंना देखील बसत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा मेणाचा पुतळा उष्णतेने वितळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय पाकिस्तानातील कराची शहरात उष्मघातेने शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले असून रशियातील अतिथंड असलेल्या सर्बियासारख्या प्रांताला देखील उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. (Abraham Lincoln wax statue melts in America Hundreds killed in Karachi due to heatstroke)

Abraham Lincoln Wax Statue
Rahul Gandhi: राहुल गांधी आषाढी वारीत सहभागी होणार? वाचा काँग्रेसची काय आहे स्ट्रॅटेजी

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे अब्राहम लिंकन यांचा सहा फुटी पुतळा आहे. त्यास लिंकन मेमोरियल म्हणूनही ओळखले जाते. हा पुतळा मेणाचा आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी तीव्र उन्हामुळे तो वितळला. आता या मूर्तीचा आकारच बदलला आहे. सुरुवातीला या मूर्तीचे डोके वितळले आणि त्यानंतर एक पाय वितळला. खुर्चीवर विराजमान अब्राहम लिंकन यांचा पुतळा उष्णतेमुळे वितळत असल्याने अमेरिकी प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

आता तर या पुतळ्यातील खुर्चीचा काही भाग देखील वितळला आहे. प्रशासनाने दखल घेत त्याची दुरुस्ती केली जात आहे. हे ठिकाण कॅम्प बार्कर नावाच्या जागी असून तेथे यादवी युद्धाच्या काळात निर्वासितांची छावणी होती. तेथे आफ्रिकी आणि अमेरिकी नागरिकांना आश्रय दिला जात होता. पुतळा वितळण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वी या पुतळ्याजवळ शंभर मेणबत्या लावल्या तेव्हाही ही मूर्ती काही प्रमाणात वितळली होती.

Abraham Lincoln Wax Statue
Pune Drugs Case: मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सूस-बाणेर इथल्या अनधिकृत बार-हॉटेल्सवर हातोडा! कारवाईला वेग

कराचीत चार दिवसांत ४५० जणांचा मृत्यू

पाकिस्तानचे दक्षिण बंदर असलेल्या कराची शहरात गेल्या चार दिवसांत उष्णतेच्या लाटेने किमान ४५० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा स्वयंसेवी संस्थेने केला आहे. तसेच हजारो नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीव्र उन्हामुळे नागरिकांच्या शरीरातील पाणी कमी होत असल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागत आहे. पण हृदयविकार आणि कर्करोगासारख्या आजाराचा सामना करणाऱ्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयातच थांबून ठेवण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसात कमाल तापमान ४० अंशापेक्षा अधिक झाले आहे. पाकिस्तानच्या इधी फाऊंडेशनकडे गेल्या चार दिवसांत ४२७ मृतदेहांची नोंद झाली असून सिंध प्रांतात तीन रुग्णालयातून २३ मृतदेह ताब्यात घेतल्याचे संस्थेने म्हटले आहे.

Abraham Lincoln Wax Statue
Kejriwal Sugar Drop: सीबीआयकडून अटक अन् केजरीवालांची शुगर झाली डाऊन; काय घडलं नेमकं जाणून घ्या

सर्बियात विक्रमी कमाल तापमान

पश्‍चिम सर्बियात जुनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत उष्ण वारे वाहण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात घट हेाऊन ते तापमान १७ ते २५ अंश सेल्सिअसवर येईल आणि पाऊस हजेरी लावेल, असे सिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. रशियाच्या सर्बियात उष्णतेच्या लाटेने विक्रम प्रस्थापित केला आहे. काही भागात गेल्या पाच दशकांतील विक्रम मोडला आहे. नोव्होसिब्रिस्क, केमेरोव्हो ओब्लास्टस याच्यासह अलटाई क्षेत्रात आणि रिपब्लिक अलटाई येथील वातावरणाने १९७० ते १९८० च्या दशकातील कमाल तापमानाचा विक्रम मागे टाकला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com