'ही भयावह क्रूरता आहे'; म्यानमार लष्कराची हिंसक दडपशाही पाहून हळहळले बायडन

biden.
biden.
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचारावर नाराजी जाहीर केली आहे. बायडन यांनी यासंदर्भात बोलताना रविवारी म्हटलं की, हे तर भयानक आहे. ही पूर्णपणे क्रूरता आहे आणि मला माहिती मिळाली आहे की मोठ्या संख्येने लोकांना विनाकारण मारलं गेलं आहे. बायडन म्यानमारमध्ये लष्करी राजवटीने सत्ता हातात घेतल्यानंतर त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या निर्दोष लोकांच्या कत्तलीबाबत बोलत होते. 
म्यानमारमध्ये लष्कराची दडपशाही सुरूच आहे. काल देशभर वार्षिक सशस्त्र सेनादल दिन साजरा केला जात असतानाच विविध ठिकाणांवर लष्कर आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत जवळपास 100 पेक्षाही अधिक लोक मारले गेले आहेत.

म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरोधात गेल्या 1 फेब्रुवारीपासून जनेतेने आंदोलन करायला सुरुवात केली होती. तेथील लष्कराने देखील पहिल्या दिवसापासूनच आंदोलकांची मुस्कटदाबी करायला सुरुवात केली आहे. त्यातील काचला दिवस सर्वाधिक रक्तरंजित आणि हिंसक होता. विविध ठिकाणांवर 100 पेक्षाही अधिक लोक मारले गेले असून आतापर्यंत या आंदोलनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या चारशेच्या वर पोचली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. म्यानमारमधील लष्कराने 1 फेब्रुवारी रोजी लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांचे लोकनिर्वाचित सरकार उलथवून टाकलं आहे. आणि सगळी सत्ता स्वत:च्या हातात घेतली आहे. त्या दिवसापासूनच म्यानमारमध्ये आंदोलनाचा वणवा पेटला आहे. मात्र, लष्कर हे आंदोलन निर्दयीपणे चिरडून टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.