इस्लामाबाद : ‘‘अफगाणिस्तानमधील दहशतवादविरोधी (Counterterrorism in Afghanistan)लढ्यात अमेरिकेला(america) साथ देऊन आम्ही स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला,’’ अशी खंत व्यक्त करत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan)यांनी अमेरिकेला साथ देण्याचा निर्णय चुकीचा होता, असे म्हटले आहे. तो निर्णय जनहितासाठी नाही, तर केवळ पैशांकडे पाहून केला गेला होता, अशी कबुलीही इम्रान यांनी दिली.
अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानमध्ये अल कायदाविरोधात सुरु केलेल्या युद्धात त्यांना पाकिस्तानची साथ मिळाली होती. तत्कालीन लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी या ‘दहशतवादविरोधी लढ्यात’ उडी घेतली होती. वीस वर्षे चाललेले हे युद्ध अमेरिकेने नुकतेच संपवले आहे. या युद्धातील पाकिस्तानच्या सहभागावर इम्रान खान फार पूर्वीपासून टीका करत आहेत. काल (ता. २१) पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना इम्रान खान म्हणाले,‘‘अमेरिकेला साथ देण्याचा निर्णय घेणाऱ्यांच्या मी त्यावेळी जवळून संपर्कात होतो. हा निर्णय घेताना कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, ते मला माहिती आहे.
दुर्दैवाने या चर्चेमध्ये पाकिस्तानी नागरिकांच्या भल्याचा कोणताही विचार झाला नव्हता. याउलट केवळ अमेरिकेकडून मिळणाऱ्या पैशांचा विचार झाला. १९८० मध्येही पाकिस्तानने ‘अफगाण-जिहाद’वेळीही हीच चूक केली होती.’’अफगाणिस्तानमधील वीस वर्षांच्या युद्धामुळे आपली ही अवस्था झाली आहे ; आपणच आपल्या पायावर दगड मारून घेतला आहे, असे परखड मत इम्रान यांनी व्यक्त केले. या वीस वर्षांच्या युद्धात ८० हजार पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला असून १०० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे, असा दावा इम्रान यांनी यापूर्वी वारंवार केला आहे.
अफगाण जनतेचा विचार व्हावा
अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना इम्रान खान म्हणाले की, अफगाणिस्तानची परदेशातील संपत्ती गोठवून या देशाच्या जनतेवर एकप्रकारे अत्याचारच केला जात आहे. अफगाणिस्तान हा पाकिस्तानच्या शेजारीच असल्याने तेथील परिस्थितीचा परिणाम आमच्यावरही होऊ शकतो. तालिबान सरकार मान्य असो वा नसो, जगाने तेथील चार कोटी जनतेचा विचार करायला हवा.
पाकिस्तानने इतरांना स्वत:चा वापर करू दिला, आर्थिक मदत मिळविण्यासाठी देशाच्या प्रतिमेचे धिंडवडे काढले आणि जनतेला कल्याणकारी नसलेले परराष्ट्र धोरण राबविले.
- इम्रान खान, पंतप्रधान, पाकिस्तान
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.