VIDEO: तालिबानकडून पोलीस प्रमुखाची भररस्त्यात हत्या

AFGHAN
AFGHAN
Updated on
Summary

एका अफगाण पोलीस प्रमुखाला तालिबान्यांनी अत्यंत क्रूरपणे मारलं आहे. हत्येचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे

काबूल- एका अफगाण पोलीस प्रमुखाला तालिबान्यांनी अत्यंत क्रूरपणे मारलं आहे. हत्येचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. एका अमेरिकी पत्रकाराने व्हिडिओ ट्विट करत उपाहासात्मक टिप्पणी केलीये, 'ही त्यांची सार्वजनिक माफी आहे'. ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये हाजी मुल्ला अचकजई यांना दाखवण्यात आलं आहे. ते हैरातच्या बगदीस प्रांतात पोलिसांचे नेतृत्व करत होते. न्यू यॉर्क टाईम्सच्या न्यूजनुसार, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली आहे. गुढघे टेकून बसलेल्या या व्यक्तीवर गोळ्या चालवण्यात आल्या. त्याच्या मृत शरिरावरही दया दाखवण्यात आली नाही. (Afghanistan Latest News)

अफगाण सरकारी अधिकाऱ्यांसाठी तालिबानकडून शुक्रवारी सार्वजनिक माफी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे तालिबान्यांचे बोलणे आणि करणे यात फरत असल्याचं दिसून येतंय. तालिबानने महिलांसह सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावर परत येण्यास सांगितलं आहे. पण, तालिबान्यांच्या मनात काय चालू आहे, हे निश्चित कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दहशतवादी संघटना तालिबानशी संबंधित नेटवर्कच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अफगान सुरक्षा सल्लागार नासिर वजीरी, अचकजई यांना व्यक्तिगत ओळखत होते. त्यांनी न्यूजवीकला सांगितलं की , या व्हिडिओ क्लिपची पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून सत्यता पडताळण्यात आली आहे. दरम्यान, तालिबानने पश्चिम अफगाणिस्तानच्या फराह प्रांतातील 340 राजकीय कैद्यांची सुटका केली आहे.

AFGHAN
१ अब्ज मुलांची होरपळ; युनिसेफच्या अहवालात निरीक्षणे

अफगाणिस्तान अत्यंत भीषण अशा परिस्थितीतून जात आहे. तालिबान नियंत्रणातील प्रदेशातून नागरिक पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबान्यांकडून होणाऱ्या अत्याचारांची त्यांना भीती आहे. तालिबान्यांपासून वाचण्यासाठी अफगाण नागरिक काबुलमधील विमानतळावर जमा होत आहेत. हे विमानतळ सध्या अमेरिकी सैनिकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे अनेकांनी विमानतळाकडे धाव घेतली आहे. पण, तालिबान्यांनी त्यांच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण केल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानमधील स्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()