अफगाणिस्तानातील शीख, हिंदुंची तालिबानसोबत बैठक, सुरक्षिततेची दिली हमी

अफगाणिस्तानातील प्रांत तालिबानने काबीज करायला सुरुवात केल्यापासून २८० शीख बांधव आणि ३०-४० हिंदुंनी कारती परवान गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे.
The Kart-e-Parwan Sikh Gurudwara in Kabul, Afghanistan
The Kart-e-Parwan Sikh Gurudwara in Kabul, Afghanistan
Updated on

काबूल: अफगाणिस्तानात (Afganistan) सत्तापालट होणार असून तिथे पुन्हा एकदा तालिबान राज (Taliban raj) येणार आहे. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या शीख (Sikh) आणि हिंदू (Hindu) समुदायाची सुरक्षितता तसचं भविष्याबद्दल एक अनिश्चितता आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानातील शीख समुदायाने सोमवारी काबुलमधील तालिबानच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

या बैठकीनंतर तालिबानने आपल्याला शांतता आणि सुरक्षिततेची हमी दिली आहे, असे शीख समुदायाच्या प्रतिनिधींनी सांगितले. अफगाणिस्तानातील प्रांत तालिबानने काबीज करायला सुरुवात केल्यापासून २८० शीख बांधव आणि ३०-४० हिंदुंनी कारती परवान गुरुद्वारामध्ये आश्रय घेतला आहे, असे अफगाणिस्तानाची शिखांचे नेते गुरनाम सिंग यांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसला त्यांनी ही माहिती दिली.

The Kart-e-Parwan Sikh Gurudwara in Kabul, Afghanistan
भारताचा जवळचा मित्र रशिया तालिबानला साथ देणार?

आज झालेल्या बैठकीला तालिबान आणि शीख समुदायाचे प्रतिनिधी हजर होते. "तालिबानी नेत्यांनी आम्हाला सुरक्षितता आणि शांततेची हमी दिली आहे. आम्हाला देश सोडून जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही शांततेत इथे राहू शकता"" असे तालिबानने आम्हाला सांगितल्याचे गुरनाम सिंग म्हणाले.

The Kart-e-Parwan Sikh Gurudwara in Kabul, Afghanistan
पैशांनी भरलेल्या ४ गाड्या अन् हेलिकॉप्टर घेऊन पळाले राष्ट्रपती घनी

आमच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचेही तालिबानने आश्वासन दिल्याचे गुरनाम सिंग यांनी माहिती दिली. कुठली समस्या आली, तर संपर्क साधण्यासाठी त्यांनी फोन नंबरही दिल्याचे गुरनाम सिंग यांनी सांगितले. जलालाबाद आणि गझनी मध्ये राहणारे हिंदू आणि शीख परिवार आता काबूलमध्ये आले आहेत. कारती परवान आणि गुरुद्वारा मनसा सिंग जी या काबुलमधल्या दोन गुरुव्दारामध्ये या कुटुंबांनी आश्रय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.