Afghanistanवर पाकिस्तानचा ताबा? अमरुल्लाह सालेह यांचा सनसनाटी दावा

Afghanistanवर पाकिस्तानचा ताबा? अमरुल्लाह सालेह यांचा सनसनाटी दावा
Updated on

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने आपला ताबा जमवून आता अडीच महिने पूर्ण झालेत. सत्ताधाऱ्यांचा पाडाव करुन तालिबानने संपूर्ण देशावर आपला ताबा मिळवला आहे. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळाले तर उपराष्ट्राध्यक्षांनी थोडी धीटाई दाखवत तालिबान विरोधात यल्गार पुकारला. त्यांनी तालिबानसमोर मान तुकवण्यास स्पष्ट नकार दिला. अफगाणिस्तानातील पंजशीर खोऱ्यात राहून काही काळ त्यांनी तालिबानविरोधात कंबर देखील कसली. या काळात ते ट्विटरवर सक्रिय राहून सातत्याने बोलत होते. त्यानंतर गायब झालेले अमरुल्लाह सालेह आता पुन्हा परतले आहेत. तब्बल 49 दिवसानंतर ट्विटरवर ट्विट करत त्यांनी पुन्हा एकदा तालिबान्यांसंदर्भात गंभीर विधाने केली आहेत. अफगाणिस्तानात तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर काय दुरावस्था झाली आहे, याचा लेखाजोखाच त्यांनी मांडला आहे. इतकंच नव्हे तर, अफगाणिस्तानला तालिबानने नव्हे तर पाकिस्तानने गिळंकृत केल्याचा ठाम आरोप त्यांनी केला आहे.

Afghanistanवर पाकिस्तानचा ताबा? अमरुल्लाह सालेह यांचा सनसनाटी दावा
लसीकरणामुळे भारताची नवी प्रतिमा

काय म्हटलंय अमरुल्लाह सालेह यांनी?

  • पाकिस्तानने अफगाणिस्तानवर गेल्या अडीच महिन्यांपासून ताबा मिळवल्याचा परिणाम

  • जीडीपी 30 टक्क्यांनी घसरला (अंदाजे)

  • गरिबी 90 टक्क्यांनी वाढली

  • शरियाच्या नावाखाली महिलांची घरगुती गुलामगिरी

  • नागरी व्यवस्था कोलमडल्या

  • प्रेस/ मीडिया/ अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट

  • शहरी मध्यमवर्ग गायब

  • बँका बंद

Afghanistanवर पाकिस्तानचा ताबा? अमरुल्लाह सालेह यांचा सनसनाटी दावा
प्रियांका गांधींचे लक्ष्य २०२२ ऐवजी २०२७!

पुढे त्यांनी म्हटलंय की, अफगाणिस्तानचे राजकीय महत्त्व असलेले ठिकाण दोहाला स्थलांतरित करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र आणि सुरक्षेशी संबंधित निर्णय आता रावळपिंडीमधून घेतले जात आहेत. तालिबानी सत्तेपेक्षा एनजीओ शक्तिशाली आहेत. पाकिस्तानी लष्कर आणि हक्कानी ग्रुप दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात गुंतले आहेत, असं देखील अमरुल्ला सालेह यांनी म्हटलंय.

पुढे अमरुल्ला सालेह यांनी ट्विटवरुन पाकिस्तानला देखील खडे बोल सुनावलेत. अफगाणिस्तान देश खूप मोठा आहे जो पाकिस्तान गिळू शकत नाही. ही काळाची बाब आहे. आम्ही सर्व बाबतीत विरोध करणार जेणेकरून आम्ही पाकिस्तानी अधिसत्तेपासून आमच्या सन्मानाचे रक्षण करू शकू. ही काळाची बाब आहे पण आपण अफगाणिस्तानचा उदय नक्कीच पाहू,” असे सालेह यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.