रक्तपात टाळण्यासाठी आफगाणिस्तान सोडलं, राष्ट्रपती घनी यांचं स्पष्टीकरण

रक्तपात टाळण्यासाठी आफगाणिस्तान सोडलं, राष्ट्रपती घनी यांचं स्पष्टीकरण
Updated on

Afghanistan Crisis : 20 वर्षानंतर तालिबान्यांनी जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. रविवारी तालिबान्यांनी राजधानी काबूलमध्ये प्रवेश करत राष्ट्रपती भवनाही ताब्यात घेतलं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अफागाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं. घनी यांनी देशाबाहेर पळ काढल्यानंतर अफगाण नागरिकांनी नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या. गनी यांनी देशाचा विश्वासघात केल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत. देशातून पलायन केल्यानंतर अश्रफ घनी नेमके कुठे आहेत? असा प्रश्न सर्वांना पडला होता. याचं उत्तर मिळालं आहे. अश्रफ घनी यांनी फेसबूक पोस्ट देश का सोडला याचं उत्तर दिलं आहे.

आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर घनी यांनी उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये आश्रय घेतलाय. अश्रफ घनी यांनी त्यांच्या सध्याच्या स्थानाची माहिती उघड केलेली नाही. अल जझीरा या वृत्तवाहिनीने घनींच्या वैयक्तिक अंगरक्षकाचा हवाला देत म्हटले की, घनी, त्यांची पत्नी, त्यांचे मुख्य कर्मचारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शेजारील उझबेकिस्तानच्या ताश्कंदमध्ये आहेत.

रक्तपात टाळण्यासाठी आफगाणिस्तान सोडलं, राष्ट्रपती घनी यांचं स्पष्टीकरण
आजपासून महाराष्ट्र अनलॉक, पाहा काय सुरु काय बंद?

तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर रक्तपात टाळण्यासाठी देशातून पलायनं केलं, असं घनी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलेय. आपल्या फेसबूक पोस्टमध्ये घनी म्हणालेत की, '20 वर्षांच्या युद्धानंतर लाखो रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आणून त्यांना कठीण निर्णयाचा सामना करावा लागला आहे. रक्तपात टाळण्यासाठी, मला वाटले की देश सोडणे चांगले आहे. '

रक्तपात टाळण्यासाठी आफगाणिस्तान सोडलं, राष्ट्रपती घनी यांचं स्पष्टीकरण
पुण्यासह सात जिल्ह्यांनी महाराष्ट्राची चिंता वाढवली

ते म्हणाले की, तालिबान्यांनी तलवार आणि बंदुकीच्या धाकाने कब्जा मिळवला आहे. आमच्या देशबांधवांच्या सन्मान, समृद्धी आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी होती. मात्र, रक्तपात टाळण्यासाठी देश सोडावा लागला.

रक्तपात टाळण्यासाठी आफगाणिस्तान सोडलं, राष्ट्रपती घनी यांचं स्पष्टीकरण
तालिबानचा अफगाणिस्तानवर कब्जा, लवकरच नामांतराची शक्यता

अफगाणिस्तानात सध्या मोठी अनागोंदी सुरु आहे. अमेरिका आणि नाटो फौजा यांनी माघार घेताच आठवडाभरातच तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तावर कब्जा मिळवला आहे. अवघ्या आठवडाभरातच तालिबानी बंडखोरांनी जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. रविवारी तालिबान्यांनी राजधानी काबूलमध्ये प्रवेश करत राष्ट्रपती भवनाही ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं. कोणत्याही क्षणी तालिबानी अफगाणिस्तानर कब्जा केल्याची घोषणा करु शकतात. अन् लवकरच अफगाणिस्तानच्या नामांतराची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अफगाणिस्तानला पुन्हा ‘इस्लामिक इमिरेट्स ऑफ अफगाणिस्तान’ (आयइए) असं तालिबानी जाहीर करणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अमेरिका आणि नाटो यांनी जवळपास 20 वर्ष अफगाणी सुरक्षा दलांची बांधणी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. तरीही तालिबान्यांनी अवघ्या आठवडाभरात संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()