Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात शक्तिशाली भूकंप! अनेक इमारती जमीनदोस्त; 2000हून अधिक जण ठार

अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार उडाला आहे.
afghanistan earthquake death toll
afghanistan earthquake death toll
Updated on

अफगाणिस्तान शनिवारी भूकंपाचे धक्के बसले. एकापाठोपाठ आलेल्या भूकंपाच्या पाच धक्यानंतर अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या. या भूकंपात पश्चिम अफगाणिस्तानमध्ये २,००० हून अधिक लोक ठार झाले, तालिबानच्या प्रवक्त्याने रविवारी याबद्दल माहिती दिली आहे. मिळालेल्या या भूकंपाची तिव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी मोजण्यात आली.

आफगाणिस्तानात झालेल्या या भूकंपामुळे मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानते सर्वात मोठे शहर हेरातपासून ४० किमी नॉर्थ वेस्टमध्ये होतं.

afghanistan earthquake death toll
Nushrratt Bharuccha: 'अकेली'ची कहानी नुसरतच्या खऱ्या आयुष्यातही घडली? इस्त्राइलमध्ये अडकल्यानंतर चाहते चिंचेत

भूकंप आल्यानंतर लोक आपली घरे सोडून पळू लागले, सोशल मीडियावर यासंबंधीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हेरातमध्ये राहणाऱ्या वशीर यांना माध्यमांना सांगितले की, आम्ही त्या वेळी ऑफिसमध्ये होतो, अचानक इमारत हादरायला लागली. त्यांनी एएफपीला सांगितलं की, भूकंप इताक तीव्र होता की, भिंतीवरचं प्लस्टर पडू लागलं आणि भिंतींना भेगा पडल्या, याव्यतिरिक्त इमारतीचा काही भाग देखील कोसळला.

afghanistan earthquake death toll
Caste Discrimination: आयआयटी शैक्षणिक संस्थेत जातीवरुन भेदभावामध्ये वाढ? सर्व्हेतून समोर आलं वास्तव

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, अद्यापही माझ्या कुटुंबियांसी संपर्क होऊ शकलेला नाहीये. मोबईल डिस्कनेक्ट झाले आहेत. आम्ही खूप घाबरलो आहोत. दरम्यान आफगाणिस्तान नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या प्रवक्त्याने सांगितलं की ग्रामिण भागात आणि डोंगराळ भागात भुस्खलनाच्या घटना देखील घडल्या आहेत. या घटनांमध्ये देखील अनेक लोक दगावले असण्याची शक्यता आहे. त्याबद्दल सध्या आमच्याकडे माहिती नाहीये.

हेरातला अफगाणिस्तानची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. येथे तब्बल १९ लाख लोक राहतात. मागील वर्षी अफगाणिस्तानात आलेल्या भूकंपात कमीत कमी १००० लोकांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.