दोन दिवसांपूर्वी काबुल विमानतळावर विमानाला लटकून प्रवास करताना दोघे विमानातून पडल्याचे व्हिडिओ समोर आले होते. बसमध्ये गर्दी करावी अशी गर्दी लोकांनी विमानात बसण्यासाठी केली होती.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर तिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी काबुल विमानतळावर मोठी गर्दी केली आहे. गेल्या तीन ते चार दिवसात अनेक घडामोडी अफगाणिस्तानमध्ये घडत आहेत. तालिबानी काबुलमध्ये धडकल्यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांनी पलायन केले. त्यानंतर उपराष्ट्रपतींनी आपण काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून काम पाहू असं जाहीर केलं.
दरम्यान, अफगाणिस्तानातील बिघडलेल्या परिस्थितीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दोन दिवसांपूर्वी काबुल विमानतळावर विमानाला लटकून प्रवास करताना दोघे विमानातून पडल्याचे व्हिडिओ समोर आले होते. बसमध्ये गर्दी करावी अशी गर्दी लोकांनी विमानात बसण्यासाठी केली होती. यावेळी चेंगराचेंगरीचे प्रकारही घडले. यातच विमानाच्या आतला एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हायरल फोटोमध्ये तो फोटो खोटा असल्याचा दावाही करण्यात येत आहे. खरंतर सध्या दोन फोटो व्हायरल होत आहेत. त्यातला एक फोटो 2013 मध्ये फिलिपाइन्समध्ये काढण्यात आलेला तर दुसरा फोटो हा अफगाणिस्तानमध्ये काढलेला आहे.
अफगाणिस्तानमधून 600 पेक्षा जास्त नागरिकांना घेऊन सी 17 विमान निघाले असल्याचा फोटो अनेकांनी शेअर केला आहे. त्यामध्ये लोक कोणतंही साहित्य न घेता, मागे काय राहिलं काय नाही हे न पाहता जीवाच्या आकांताने देश सोडत असल्याचं सांगत फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो फेक असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र एअर मोबिलिटी कमांड पब्लिक अफेअर्स आणि सॅटेलाइट इमेज मक्सार टेक्नॉलॉजीने हा फोटो अफगाणिस्तानमधीलच असल्याचं म्हटलं आहे. अनेक अधिकाऱ्यांनी हा फोटो शेअर करताना अफगाणिस्तानमधली परिस्थिती किती भंयकर आहे हे सांगितलं आहे.
15 ऑगस्ट रोजी हमिद करझाइ आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा फोटो टिपण्यात आला आहे. अमेरिकेच्या सी 17 ग्लोबमास्टर 3 मध्ये 640 अफगाण नागरिक होते अशी माहिती अमेरिकेच्या एअर मोबिलिटी कमांड पब्लिक अफेअर्स ऑफिसने दिली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काबुल विमानतळावर माणसांच्या गर्दीचे सॅटेलाइट फोटो Maxar टेक्नॉलॉजीने प्रसिद्ध केले होते.
खऱ्या फोटोसोबत आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. फोटो शेअर करताना अफगाणिस्तानमधील असल्याचा दावा केला जातोय. मात्र 2013 मधील हा फोटो असून तो अमेरिकेच्या एअर फोर्स स्टाफने फिलिपिन्समध्ये टिपला होता.
670 हून अधिक रहिवाशांना Tacloban मधून Manila इथे नेण्यात आलं होतं. फिलिपिन्सला तेव्हा Typhoon Haiyan या चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. 17 नोव्हेंबर 2013 मधील हा फोटो आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.