"आम्हाला संपूर्ण जगाकडून मदतीची नितांत गरज आहे. परराष्ट्रांनी अफगाण लोकांप्रती दयाळूपणा आणि सहानुभूती दाखवावी अशी आमची इच्छा आहे," असे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी (amir khan muttaqi) यांनी एका मुलाखतीत सांगितले. अफगाणिस्तानचा (afghanistan) नवीन शासक तालिबान (taliban) मुलींना, स्त्रियांना शिक्षण आणि नोकऱ्या देण्याच्या तत्त्वाशी बांधील आहे. त्याच वेळी, त्यांना पूर्वीची राजवट बदलायची आहे. असे मुट्टाकी म्हणाले
अमेरिकेशी कोणतीही अडचण नाही
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुट्टाकी यांनी सांगितले की, तालिबान सरकारला सर्व देशांशी चांगले संबंध हवे आहेत आणि त्यांना अमेरिकेशी कोणतीही अडचण नाही. 15 ऑगस्ट 2021 तालिबान सत्तेवर आल्यानंतर थांबवण्यात आलेला US $10 अब्ज निधी पूर्ववत करण्यासाठी त्यांनी अमेरिका आणि इतर देशांना विनंती केली. अफगाणिस्तानवर निर्बंध लादून काही फायदा होणार नाही, असे मुट्टाकी म्हणाले
पूर्वीच्या राजवटीत घडवायचांय बदल
अफगाणिस्तान अस्थिर करणे किंवा आपले सरकार कमकुवत करणे असा हेतू नाही. सोमवारीच व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानकडे फारच कमी साठा शिल्लक आहे. दरम्यान, मुट्टाकी यांनी तालिबानच्या मुलींच्या शिक्षणावर आणि महिलांच्या नोकऱ्यांवर घातलेल्या निर्बंधांबद्दल जगाचा रोष मान्य करत, तालिबानला पूर्वीच्या राजवटीत बदल घडवायचे असल्याचे सांगितले.
ड्रोन हल्ला करणाऱ्या अमेरिकन सैनिकांवर कारवाई नाही.
अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागॉनने सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ल्यासाठी कोणत्याही अमेरिकन सैनिकाला शिक्षा दिली जाणार नाही, या हल्ल्यात लहान मुलांसह १० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.