अफगाणिस्तान : दोन वेगवेगळ्या स्फोटात 14 लोक ठार, ISIS नं केलं तीन बसना लक्ष्य

Afghanistan Mosque Bombing
Afghanistan Mosque Bombingesakal
Updated on
Summary

देशाच्या उत्तरेकडील तीन मिनी-व्हॅन बॉम्बस्फोटात नऊ जण ठार झाले आहेत.

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमधील (Kabul) एका मशिदीच्या आत झालेल्या स्फोटात किमान पाच जण ठार झाले, तर देशाच्या उत्तरेकडील तीन मिनी-व्हॅन बॉम्बस्फोटात नऊ जण ठार झाले आहेत. तालिबाननं (Taliban) ही माहिती दिलीय. इस्लामिक स्टेटशी (IS) संलग्न असलेल्या स्थानिक गटानं मिनी व्हॅनमधील स्फोटांची जबाबदारी स्वीकारलीय.

काबूल इमर्जन्सी हॉस्पिटलनं (Kabul Emergency Hospital) सांगितलं की, मशिदीवरील बॉम्बस्फोटात (Mosque Bombing) जखमी झालेल्या 22 लोकांना रुग्णालयात आणण्यात आलं होतं, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झालाय. काबूलमधील तालिबान पोलिसांचे प्रवक्ते खालिद झदरन यांनी सांगितलं की, 'हजरत झकारिया मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाहीय.'

Afghanistan Mosque Bombing
शारीरिक संबंधानंतर तरुणानं लग्नास दिला नकार, दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

झदरन पुढं म्हणाले, जेव्हा मशिदीत स्फोट झाला तेव्हा संध्याकाळच्या नमाजासाठी लोक जमले होते. इथं मशिदीत स्फोटक उपकरणं ठेवण्यात आली होती. या स्फोटात नऊ जण ठार झाले, तर 15 जण जखमी झाले, असं त्यांनी सांगितलं. एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, मजार-ए-शरीफ इथं झालेले सर्व बळी हे देशातील अल्पसंख्याक शिया मुस्लिम समुदायाचे होते. आयएस या वृत्तसंस्थेनं अमाकच्या माध्यमातून जारी केलेल्या निवेदनात सुन्नी दहशतवादी गटानं मिनी व्हॅनमधील स्फोटांची माहिती दिलीय. निवेदनात म्हटलंय की, 'आयएसनं तीन बसेसना आयईडीनं लक्ष्य केलं.'

Afghanistan Mosque Bombing
Indian Army : जम्मू-कश्मीरमध्ये 24 तासात 6 दहशतवाद्यांचा खात्मा

काबूलच्या मशिदीवरील हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाहीय, परंतु खोरासन प्रांतातील इस्लामिक स्टेट या आयएसशी संलग्न प्रादेशिक गटानं हे घडवून आणल्याचं दिसतं. हा गट 2014 पासून अफगाणिस्तानमध्ये सक्रिय आहे आणि देशातील नवीन तालिबान शासकांसमोर सुरक्षेचं मोठं आव्हान उभं करत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानात सत्ता काबीज केल्यानंतर तालिबाननं पूर्व अफगाणिस्तानमध्ये आयएसविरोधात जोरदार कारवाई केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.