Afghanistan : बल्ख प्रांतात मोठा स्फोट, हल्लेखोरांनी केली बसला लक्ष्य; 20 कर्मचारी ठार

मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Balkh Province Explosion
Balkh Province Explosionesakal
Updated on
Summary

मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अफगाणिस्तानच्या (Afghanistan) बल्ख प्रांतात आज (मंगळवार) मोठा स्फोट झाला. हल्लेखोरांनी मजार-ए-शरीफ इथं एका प्रवासी बसला लक्ष्य केलं. या हल्ल्यात बसचं पूर्ण नुकसान झालंय.

या घटनेत 20 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तसंच मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व मृत हे उत्तर अफगाणिस्तानात असलेल्या तेल कंपनीचे कर्मचारी आहेत.

Balkh Province Explosion
Crime News : 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या प्रियकारनं कापले प्रेयसीचे दोन्ही हात; दोघांत जोरदार भांडण

उत्तर बल्ख प्रांताचे पोलिस प्रवक्ते मोहम्मद आसिफ वजीरी यांनी माहिती दिली की, मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बसला लक्ष्य करण्यात आलं. या बसमध्ये तेल कंपन्यांचे कर्मचारी होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात या घटनेत किमान 4 जण जखमी झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मात्र, आतापर्यंत या स्फोटाची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.