अफगाणिस्तानातून इराण, पाकिस्तानात 10 लाखांहून अधिक नागरीक स्थलांतरीत

गेल्या चार महिन्यांत देशातील १० लाखांहून अधिक नागरीकांनी अफगाणिस्तानातून स्थलांतर
Afghanistan
AfghanistanEsakal
Updated on

अफगाणिस्तान: तालिबानने अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानातील नागरीकांची अवस्था दयनिय झाली आहे. तालिबानने (Taliban)सत्ता हाती घेतल्यानंतर लोकांचे मूलभूत अधिकार दडपले गेले आहेत. याचा परीणाम महामारी, आर्थिक संकट, दुष्काळ-उपासमारीचा सामना नागरीकांना करावा लागत आहे. तालिबानच्या दहशतीला कंटाळून गेल्या चार महिन्यांत देशातील १० लाखांहून अधिक नागरीकांनी अफगाणिस्तानातून स्थलांतर केले आहे. अशी माहिती न्यूयॉर्क टाइम्सच्या स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

गेल्या चार महिन्यात अफगाणिस्तानचा अब्जावधी डॉलरचा निधी गोठवला आहे. अफगाणिस्तानचे चलन कोसळत आहे. सत्तांतर झाले तेव्हा ७७ अफगाणीच्या (अफगाणिस्तानचे चलन) बदल्यात एक डॉलर मिळत होता. ६ डिसेंबरला हाच दर ९७ अफगाणी होता, तर १३ डिसेंबरपर्यत सकाळी काबूलच्या सराई शाहजादा मनी मार्केटमध्ये डॉलरसाठी ११२ अफगाणी, तर दुपारी १२५ अफगाणी द्यावे लागत होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीतून हे समोर आले आहे की, ९८ टक्के अफगाणिस्तानी जनतेला पुरेसे अन्न मिळत नाही.

दहापैकी सात कुटुंबांना पोट भरण्यासाठी अन्नधान्य उसने घ्यावे लागत आहे. हिवाळ्यात सव्वादोन कोटी अफगाणी जनतेला म्हणजे निम्म्या लोकसंख्येला टोकाच्या अन्नधान्य टंचाईला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे त्यांना स्थलांतर होण्याशिवाय पर्याय नाही अशी बिकट स्थिती अफगाणिस्तानात आहे. येथील नागरीक इराण (Iran)आणि पाकिस्तानात (Pakistan)स्थलांतर होत आहेत.

Afghanistan
पाकिस्तानमध्ये दहशतवाद विरोधात विशेष मोहिम, २० दहशतवादी मारल्याचा दावा
Summary

तालिबानच्या दहशतीला कंटाळून गेल्या चार महिन्यांत देशातील १० लाखांहून अधिक नागरीकांनी अफगाणिस्तानातून स्थलांतर केले आहे.

इराण, पाकिस्तानाकडे स्थलांतर

अफगाणिस्तानची अर्थव्यवस्थाही कोलमडल्यानंतर नागरीक इराण आणि पाकिस्तानमध्ये स्थलांतर करत आहेत. साधारणपणे नियमित ४ हजार लोक स्थलांतर करत असल्याची माहिती एका खासगी वाहतूक उद्योगाच्या प्रमुखानी सांगितली आहे. या संदर्भात टोलो न्यूजने स्थलांतरीत होत असलेल्या नागरीकांची चौकशी केली. यावेळी एका नागरीकाने सांगितले की,अफगाणिस्तानमध्ये गरिबी, बेरोजगारी आणि तरुणांना शैक्षणिक संधी नाही. 'मला स्थलांतर माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी व्हावे लागत आहे. शिक्षण मंत्रालयात १० वर्षे काम करणारे मोहम्मद अयुब म्हणाले, अफगाणिस्तानमधील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी कुटुंब सुरक्षित नाही म्हणून मी इराणला जाण्याचा निर्णय घेतला आहे. सीमा ओलांडू इच्छिणाऱ्या अनेक नागरीकांना पाकिस्तानात जायचे आहे असेही ते म्हणाले.

एका खासगी वाहतूक कंपनीचे प्रमुख इस्माईल जवानमर्द अमरखेल म्हणाले, दररोज आम्ही येथून (काबुल) कंदहार, निमरोज आणि हेरात प्रांतांमध्ये ३५०० ते ४०००लोकांची वाहतूक करतो." इस्लामिक अमिरातीचे उप प्रवक्ते बिलाल करीमी म्हणाले, इस्लामिक अमिरातीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, अफगाणिस्तानातून दररोज १५०० ते २००० लोक इराणला जात आहेत. इराणमध्ये प्रवेश करणार्‍या अनेक स्थलांतरितांना तुर्कीची सीमा ओलांडायची आहे जेणेकरून ते आश्रयासाठी युरोपमध्ये जातील, असे ही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.