तालिबान्यांचा अर्ध्याहून अधिक अफगाणिस्तानवर कब्जा
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात सध्या मोठी अनागोंदी सुरु असून तालिबान्यांनी अर्ध्या अधिक अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. आज सकाळी त्यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूल हे शहरही ताब्यात घेतलं. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अफागाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडला आहे, टोलो न्यूजच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.
ताज्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी देश सोडल्यानंतर ताजिकिस्तानातात आश्रय घेतला आहे. अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्याचं रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
दरम्यान, गनी यांच्यासोबत कोणकोणत्या नेत्यांनी देश सोडला आहे. आज सकाळीच काळजीवाहू संरक्षणंत्री बिस्मिल्लाह अहमदी यांनी सांगितलं होतं की, राष्ट्रपतींनी देशाच्या राजकीय नेतृत्वाची सध्याच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी अधिकृरित्या नेमणूक केली आहे. त्यामुळे ते देश सोडणार असल्याच्या चर्चा तेव्हापासूनच सुरु झाल्या होत्या.
काबूलवरही तालिबान्यांचा कब्जा
तालिबानने अफगाण सरकारचा शेवटचा किल्ला काबूलवरही विजय मिळवला आहे. याचबरोबर तालिबानने २० वर्षांनंतर काबूलमध्ये पुन्हा एकदा सत्ता राखली आहे. सन २०२१ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तालिबान्यांना काबूल सोडून पळ काढावा लागला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.