अफगाणिस्तानातून भारतीयांना मायदेशी परतण्याचं दुतावासाने केलं आवाहन

taliban
taliban
Updated on

काबुल: अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. हे पाहता आता भारतीय दुतावासाने मजार-ए-शरीफच्या आसपास राहणाऱ्या सगळ्या भारतीय नागरिकांना भारतात परतण्याच आवाहन केलं आहे. दूतावासाने ट्विट करत हे आवाहन केलं आहे. ट्विटरवर म्हटलंय की, मजार-ए-शरीफमधून नवी दिल्लीकडे मंगळवारी सायंकाळी एक विशेष फ्लाईट रवाना होणार आहे. त्यामुळे मजार-ए-शरीफच्या आसपास राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आजच सायंकाळी प्रस्थान करणाऱ्या या विशेष फ्लाईटमधून भारताकडे रवाना व्हावं.

taliban
जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर केला ग्रेनेड हल्ला
taliban
जम्मू-काश्मीरमध्ये किती जणांनी घेतली जमीन? सरकारने दिली संसदेत माहिती

भारतीय दुतावासाने पुढे म्हटलंय की, या विशेष उड्डानाने जाण्यासाठी इच्छुक भारतीय नागरिकांनी आपले संपूर्ण नाव, पासपोर्ट नंबर, समाप्तीची तारीख व्हाट्सऍपद्वारे खालील क्रमांकावर तातडीने पाठवावे. अफगाणिस्तानामध्ये तालिबानच्या वाढत्या वर्चस्वाला पाहता या प्रकारचे निर्णय घ्यावे लागत आहेत.

अफागाणिस्तानातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली आहे. जसजसा वेळ जाईल, तसतसा तालिबान अफगाणिस्तानवरील आपला ताबा अधिकच घट्ट करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तालिबानने अफगाणिस्तानातील पाच प्रांताच्या राजधानींवर ताबा मिळवला आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरच भारतीय दुतावासाने भारतीयांना मायदेशी परतण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.