काबुल: कट्टर धार्मिक विचारांच्या शासनामुळे अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सर्वसामान्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या अफगाणिस्तानात महागाईचा दर वाढल्याने लाखो लोकांना उपासमारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. महागाई इतकी वाढलीय की पिठाच्या (Flour) एक पोत्याचा दर 2400 रुपये तर तांदळाच्या (Rice)एका पोत्याची विक्रि 2700 रुपयांनी होत आहे. याचबरोबर डाळी, खाद्यतेलाचे दरही वाढले आहेत. या वर्षी हिवाळ्यात, 2.28 कोटींहून अधिक म्हणजे अफगाणिस्तानच्या निम्म्या लोकसंख्येला खाण्यापिण्याच्या टंचाईचा सामना करावा लागेल. शिवाय यापैकी ८७ लाख लोकांच्यावर दुष्काळसदृश परिस्थितीत उपासमारीची वेळ येणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) दिला आहे.
खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे यूएनच्या अनेक संस्थांनी अफगाणिस्तानमध्ये मोठ्या मानवनिर्मित संकटाचा इशाराही दिला आहे. अफगाण रुपयाच्या तुलनेत डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे अन्नधान्य, तेल यासारख्या जीवनावश्यक वस्तूं महाग झाल्याची माहिती एका दुकानाचे मालक सैफुल्लाह यांनी दिली आहे.
टोलो न्यूजच्या माहितीनुसार, सैफुल्लाहने सांगितले की, आम्ही सर्व वस्तू डॉलरमध्ये खरेदी करतो आणि नंतर अफगाणी रुपयांमध्ये विकतो. अफगाणिस्तानात सध्या एका पिठाच्या पोत्याचा दर 2400 रुपये तर तांदळाच्या एक पोत्याचा दर 2700 रुपये आहे. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरीक दोन वेळ जेवू शकत नाहित. काबूलचे शाह आगा म्हणाले की, येथील कामगार दिवसभर काम करून 100-150 रूपये मिळवतात. परंतु यातुन दोन वेळच्या जेवणाचा खर्च भागवू शकत नाहीत.
दरम्यान, बाहेरून येणारा माल महाग असला तरी स्वदेशी वस्तू स्वस्त असल्याचा दावा तालिबान (Taliban)सरकारचे कृषी मंत्रालयाने केलाआहे. तर न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात म्हटले आहे की, तालिबान सत्तेवर येऊन चार महिने उलटले तरी अफगाणिस्तानमध्ये उपासमारीचे संकट कायम आहे. तर हिवाळ्यात लाखो मुलांचा यामुळे मृत्यू होईल अशी शक्यता मदतकार्यात गुंतलेल्या एजन्सीं करत आहेत.
आंतरराष्ट्रीय समुदायाने पुरेशी मदत दिली नाही तर लाखो लोक उपासमारीने मरतील.
इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपचे म्हणणे आहे की, तालिबानचे लोक आधुनिक अर्थव्यवस्था आणि बाजाराच्या गरजेनुसार सरकार चालवण्यात अपयशी ठरले आहेत. परदेशी देणगीदारही पुढे येत नाहीत. जर आंतरराष्ट्रीय समुदायाने पुरेशी मदत दिली नाही तर लाखो लोक उपासमारीने मरतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.