अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केलाय. हजारो लोक दररोज देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. अफगाणिस्तानी नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत. देशात मानवीय संकट निर्माण झाले आहे.
काबूल- अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केलाय. हजारो लोक दररोज देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. अफगाणिस्तानी नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत. देशात मानवीय संकट निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय संघटनांनी अफगाणिस्तानबाबत चिंता व्यक्त केली आहे. तालिबानच्या ताब्यानंतर देशात मानवीय संकटाची एक साखळी सुरु होईल, असा दावा करण्यात आलाय. यामध्ये आरोग्य समस्येसह भूकबळी आणि इतर आजारांचा उल्लेख करण्यात आला आहे. याचा थेट प्रभाव 1 कोटींपेक्षा अधिक लहान मुले आणि महिलांवर पडणार आहे. (afghanistan International Latest News)
जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी एक वक्तव्य जारी करत अफगाणिस्तानमधील आरोग्य स्थितीबाबत चिंता व्यक्त केलीये. देशात असंख्य लोक संघर्षामुळे भूक आणि इतर आजारांच्या कचाट्यात आल्याचा दावा संघटनेने केलाय. देशातील अर्ध्या लोकसंख्येला मदतीची गरज आहे, यात 1 कोटींपेक्षा अधिक लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, संयुक्त राष्ट्र एजेन्सीचे प्रवक्ता तारिक जसारेविक यांनी म्हटलंय की, अफगाणिस्तानमधील स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. महिला आरोग्य कर्मचारी महिलांपर्यंत पोहोचतील याची निश्चिती करणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही अडचणीशिवाय आरोग्य सुविधा सुरु ठेवणे गरजेचं आहे.
यूनायटेड किंगडमने म्हटलंय की, तालिबान देश सोडून देशात येणाऱ्या अफगाण शरणार्थींना कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस दिला जाणार आहे. इंग्लंड, स्कॉटलँड आणि वेल्सही येणाऱ्या अफगाण नागरिकांसाठी घर आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी आपत्कालीन निधीचा वापर करत आहेत. रिपोर्टनुसार, यूके मानवीय सहाय्यासाठी आर्थिक मदत दुप्पट करणार आहे. जवळपास 20,000 अफगाण नागरिकांना सशक्त करुन त्यांना निवारा पुरवण्याचे काम सुरु आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने इतर देशांना मदतीचे आवाहन केले आहे. अफगाणिस्तानमधील स्थिती खूप नाजूक बनली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला निरंतर मदत देणे आवश्यक असल्याचं संघटनेने म्हटलं आहे. दरम्यान, अफगाण नागरिकांच्या मदतीसाठी अनेक देश पुढे येताना दिसत आहेत. अनेकांनी अफगाण नागरिकांना आश्रय देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांना अफगाणिस्तान सोडायचा आहे, अशांना सर्वोतपरी मदत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.