Africa Splitting : आफ्रिकेतील जमिन दुभंगतेय? निसर्गाच्या इच्छेचा थरारक व्हिडीओ!

अफ्रिकेतील या देशांना मिळणार महासागर
Africa Splitting
Africa Splittingesakal
Updated on

जगात जेव्हा काही विनाशकारी होतं. तेव्हा एका चांगल्या गोष्टीची सुरूवात होते. पूर्वीपासून हे असंच सुरू आहे आणि भविष्यातही तेच होणार आहे. याची सुरूवात आफ्रिकेतून झाली आहे. अफ्रिका खंडातील एका ठिकाणी जमिनीला भेग पडली असून ती दरवर्षी थोडी थोडी वाढत आहे.

Africa Splitting
Thunder Village : या देशात आहे विजांचे गाव; लोक रहायलाही घाबरतात!

2018 मध्ये केनियाची राजधानी नैरोबीपासून सुमारे 142 किमी अंतरावर असलेल्या नारोक या छोट्याशा गावात अशाच प्रकारचे भगदाड दिसले होते. मुसळधार पावसानंतर येथे पडलेल्या भेगा वाढतच होत्या.

Africa Splitting
Earth Rotation : पृथ्वीच्या आतील गाभ्याचं रोटेशन थांबलं; नव्या अभ्यासातून महत्त्वपूर्ण माहिती उघड

हि नैसर्गिक आपत्ती पावसामुळे असू शकते. परंतु भूगर्भशास्त्रज्ञांचे मत आहे की जमिनीच्या आतील कंपनांमुळे वर एक दरी तयार झाली आहे. ही दरी दरवर्षी 7 मिमी इतकी पसरत आहे.

Africa Splitting
Farmer Study Tour : महाराष्ट्रातील जमिनीत चांगल्या हळदीचे उत्पादन शक्य : डॉ. निर्मल बाबू

आफ्रिकन महाद्वीपचे दोन भागात विभाजन झाले तर नवीन महासागर निर्माण होईल. त्यामुळे भूपरिवेष्टित असलेल्या अनेक देशांनाही समुद्रकिनारे असण्याची अपेक्षा आहे.

अफ्रिका खंड
अफ्रिका खंड esakal
Africa Splitting
Nature Tourism : निसर्गाची वाट, वरंधा घाट

सध्या आफ्रिका खंडात असे 6 देश आहेत जे सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले आहेत. मात्र या जमिन विभागणीनंतर 6 देशांना एक महासागर मिळणार आहे. या देशात रवांडा, युगांडा, काँगो, बुरुंडी, मलावी, झांबिया यांचा तर केनिया, टांझानिया आणि इथिओपियामध्ये प्रत्येकी दोन प्रदेशांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.