तेलाच्या टँकरमध्ये भीषण स्फोट; 91 नागरिकांचा मृत्यू

Sierra Leone Fuel Depot Blast
Sierra Leone Fuel Depot Blastesakal
Updated on
Summary

आफ्रिकन देश सिएरा लिओनमध्ये एक मोठी दुर्घटना घडलीय. येथील तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झालाय.

Sierra Leone Fuel Depot Blast : आफ्रिकन देश सिएरा लिओनमध्ये एक मोठी दुर्घटना घडलीय. येथील तेलाच्या टँकरमध्ये मोठा स्फोट झालाय. यामुळं किमान 91 नागरिकांचा मृत्यू, तर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचे समजते. देशाची राजधानी फ्रीटाउनमध्ये (Freetown) ही घटना घडलीय. 40 फूट उंच तेलाच्या टँकरनं दुसऱ्या वाहनाला धडक दिल्यानं ही घटना घडली. यानंतर त्यात मोठा स्फोट झाला. त्यामुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडालीय. स्थानिक माध्यमांनी या घटनेचा एक व्हिडिओ देखील जारी केलाय, त्यामध्ये टँकरभोवती लोकांचे मृतदेह विखुरलेले दिसत आहेत.

येथील महापौर इव्होन अकी-सॉयर यांनी (Yvonne Aki-Sawyerr) व्हिडिओ फुटेज पाहिल्यानंतर, या घटनेचं वर्णन 'भयानक' असं केलंय. किती नुकसान झालं हे सांगणं कठीण असल्याचंही ते म्हणाले. फेसबुक पोस्टमध्ये महापौर सांगतात, 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची अफवा आहे. मात्र, अद्याप अधिकृत मृतांचा आकडा समोर आलेला नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे, असं ते म्हणाले.

Sierra Leone Fuel Depot Blast
बंदुकधाऱ्यांची दहशत; निरपराधांवर गोळ्या झाडत 70 जणांचा केला खात्मा

वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना सरकारी माध्यमांनी मृतांचा आकडा 91 दाखवला. पण, नेमका आकडा अद्याप कोणालाच माहीत नाही. शहरातील वेलिंगटन परिसरातील एका सुपरमार्केटच्या बाहेर हा स्फोट झाल्याचे समजते. सिएरा लिओनच्या नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सीचे प्रमुख ब्रिमा ब्यूरेह सेसे यांनी स्थानिक मीडियाला सांगितलं, की हा एक भयंकर अपघात होता. या शहरामध्ये दहा लाखांहून अधिक लोक राहतात. ज्यांनी अलिकडच्या वर्षांत अनेक गंभीर संकटांचा सामना केलाय. मार्चच्या सुरुवातीला, शहरातील झोपडपट्टीत भीषण आग लागल्यानं 80 हून अधिक लोक जखमी झाले होते. आगीच्या घटनेनंतर 5,000 हून अधिक लोकांना बेघर व्हावं लागलं. तर 2017 मध्ये अतिवृष्टीमुळे 1,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी शहरात भूस्खलनही झाले होते, त्यात सुमारे 3,000 लोक बेघर झाले होते.

Sierra Leone Fuel Depot Blast
टेनिस स्टारचा माजी उपपंतप्रधानांवर लैंगिक शोषणाचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()