20 वर्ष गरीब असल्याचं केलं नाटक, नंतर लेकाला कळालं कोट्यधीश बापाचं सत्य, पुढे काय घडलं?

Viral Story: वडिलांनी आपण श्रीमंत असल्याची माहिती मुलापासून लपवून ठेवली. तब्बल २० वर्षानंतर मुलाला खऱ्या परिस्थितीची माहिती देण्यात आली.
china story
china storyEsakal
Updated on

बिजिंग- गजनी चित्रपटामध्ये संजय सिन्हा (आमिर खान) आपण कोट्यधीश असल्याची माहिती प्रेयसी कल्पना शेट्टीपासून (असिन) लपवून ठेवतो. संपत्तीला पाहून नाही तर त्याला पाहून तिने प्रेम करावे अशी संजय सिन्हाची इच्छा असते. असाच एक प्रकार चीनमध्ये घडला आहे. याठिकाणी वडिलांनी आपण श्रीमंत असल्याची माहिती मुलापासून लपवून ठेवली. तब्बल २० वर्षानंतर मुलाला खऱ्या परिस्थितीची माहिती देण्यात आली. (After 20 years son learns that the father is a millionaire He was pretending to be poor)

एका मोठ्या ब्रँडचे मालक आणि कोट्यवधी संपत्ती असलेल्या वडिलांनी मुलापासून आपण श्रीमंत असल्याची माहिती लपवून ठेवली. जेव्हा मुलाने विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. तेव्हा त्याला खरी माहिती सांगण्यात आली. या घटनेवरुन सोशल मीडियामध्ये बरीच चर्चा घडून येत आहे. २४ वर्षीय झांग जिलोंग याने स्थानिक मीडियाशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली आहे. तो म्हणाला की, आपण श्रीमंत असल्याचं वडील झांग योडूंग यांनी २० वर्षानंतर सांगितलं.

china story
Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमधील 'तो' व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? 'डीपफेक' असल्याचा संशय

मेहनतीने यावं पुढे

मुलाने मेहनत घेऊन स्वत:च्या हिमतीने यश मिळवावं अशी वडिलांची इच्छा होती. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार, ५१ वर्षीय झांग सीनियर हे एका प्रसिद्ध ब्रँड साखळीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी दरवर्षी ६०० मिलियन युआन (८३ मिलियन अमेरिकी डॉलर) इतक्या किंमतीचे उत्पादन घेते. झांग ज्युनियरचा ज्या वर्षी जन्म झाला, त्याच वर्षी या ब्रँडची स्थापन करण्यात आली होती.

झांग ज्युनियरचं म्हणणं आहे की, तो पिंगडियांग काऊंटीमधील एका छोट्याच्या फ्लॅटमध्ये राहिला आहे. मध्य चीनमधील हुनान प्रांतातील ही जागा आहे. झांग ज्युनियरला आपल्या वडिलांच्या ब्रँडबाबत माहिती होती, पण त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं की कंपनी चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यात आले आहे. कंपनी खूप तोट्यामध्ये आहे.

china story
Mother-Daughter Fight Back Video : घरात घुसलेल्या दोन हत्यारबंद चोरांना माय-लेकींनी चांगलचं धुतलं! घटनेचा Video Viral

मुलगा नोकरीच्या होता शोधात

झांग ज्युनिरला आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगण्यात आले. वशिला किंवा श्रीमंतीचा फायदा न घेता त्याला राजधानी चांग्शामध्ये एका चांगल्या सेकेंडरी स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला होता. विद्यापीठातील शिक्षण झाल्यानंतर झांग ज्युनियरला एक नोकरी हवी होती.

झांगने दर महिना ६००० युआन (८०० डॉलर) रुपये पगार देणारी एक नोकरी धरली. या पैशातून त्याला वडिलांवर असलेले कर्ज फेडायचे होते.पण, त्यानंतर वडिलांकडून खऱ्या आर्थिक परिस्थितीची माहिती देण्यात आली. ते एका नव्या घरात राहायला देखील गेले. या घराची किंमत तब्बल १.४ मिलियन डॉलर इतकी होती. झांग ज्युनियर आता आपल्या वडिलांची कंपनी पुढे चालवणार आहे.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()