Coronavirus : चीन, जपाननंतर आता दक्षिण कोरियातही कोरोनाचा उद्रेक; जगभरात विषाणूची झपाट्यानं वाढ

जगभरात पुन्हा कोरोना विषाणूनं डोकं वर काढलं आहे.
Coronavirus in South Korea
Coronavirus in South Korea esakal
Updated on
Summary

जगभरात पुन्हा कोरोना विषाणूनं डोकं वर काढलं आहे.

सियोल : जगभरात पुन्हा कोरोना विषाणूनं डोकं वर काढलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा (Coronavirus in China) उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियातही कोरोनाचा मोठा प्रमाणात फैलाव सुरु आहे.

आज (रविवार) दक्षिण कोरियामध्ये सलग पाचव्या दिवशी कोविड-19 ची नवीन प्रकरणं कमी झाली. परंतु, गंभीर आजारी रुग्णांची संख्या जवळपास आठ महिन्यांत सर्वाधिक झालीये. देशात आतापर्यंत 57,527 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

देशानं 57,527 नवीन कोरोना संसर्गाची पुष्टी केलीये. यात परदेशातील 110 जणांचा समावेश आहे. देशातली एकूण संख्या 29,116,800 वर पोहोचली आहे. योनहाप वृत्तसंस्थेनं कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक एजन्सीच्या (KDCA) हवाल्यानं ही माहिती दिली आहे.

Coronavirus in South Korea
BJP Strategy : भाजपसाठी 2022 ठरलं सर्वोत्कृष्ट; आता 2023 मध्ये पक्षाला 'या' 10 आव्हानांना सामोरं जावं लागणार!

KDCA नुसार, देशात आतापर्यंत 63 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 32,219 झाली आहे. तर, मृत्यू दर 0.11 टक्के आहे. याशिवाय, गंभीर आजारी रुग्णांची संख्या आदल्या दिवशी 557 वरून 636 वर पोहोचलीये.

Coronavirus in South Korea
Sports Minister : आधी केली मैत्री, नंतर दिली प्रेयसी बनण्याची ऑफर; विनयभंगाचा आरोप होताच क्रीडामंत्र्यांचा राजीनामा

अमेरिकेतही कोरोनाची दहशत

CDC नुसार, कोविड-19 XBB.1.5 चा नवीन प्रकार यूएसमध्ये 40 टक्क्यांपर्यंत पसरला आहे. त्यामुळं रुग्णालयातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. BQ आणि XBB च्या प्रकारांपेक्षा हा प्रकार संसर्ग पसरवण्यासाठी अधिक धोकादायक ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.