नवी दिल्ली- मालदीव आणि भारतामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी मोठं वक्तव्य केलंय. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरुन आलेल्या मुइझ्झू यांनी भारतावर निशाणा साधला आहे. कोणत्याच देशाला आमच्यावर दादागिरी गाजवण्याचा अधिकार नाही, असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. (After China visit Maldives President Muizzu said that no country had the right to bully the island nation)
आम्ही लहान देश असू पण, यामुळे तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळत नाही, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपमध्ये गेले होते. या त्यांच्या दौऱ्यावरुन मालदीवच्या काही नेत्यांना मिरची लागली होती. त्यांनी मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालाय.
पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर त्यांनी एक्सवर पोस्ट करुन लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी येण्याचं आवाहन लोकांना केलं होतं. पण, मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी या दौऱ्यावरुन मोदींना लक्ष्य केलं. यावरुन भारताने आक्षेप घेतला होता. मालदीववर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली होती.
भारताच्या गंभीर इशाऱ्यानंतर मालदीव सरकार काहीसा नमला होता. मालदीव सरकारने आपल्या तीन उपमंत्र्यांचं निलंबन केलं होतं. अनेक भारतीयांनी मालदीवला पर्यंटनासाठी जाणे रद्द केलं होतं. बॉलिवूड कलाकारांनी देखील यावरुन कठोर भूमिका घेतली होती. त्यानंतर मालदीव सरकारला मंत्र्यावर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.
दरम्यान, मालदीवमध्ये ऑक्टोबर महिन्यात मुइझ्झू सरकार अस्तित्वात आलं आहे. मुइझ्झू हे चीन समर्थक मानले जातात. त्यांनी सत्तेत येताच भारतीय सैनिक मालदीवमधून परत बोलावण्याची औपचारिंक विनंती केली होती. त्यावरुन त्यांची भारताबाबची भूमिका स्पष्ट झाली होती.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.