कोरोना असल्याचं विमानात कळलं, बाथरुमध्येच केलं क्वॉरनटाईन

या महिलेने उड्डाणापूर्वी केलेल्या टेस्टमध्ये तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
अन्‌ तिने विमानात दिला बाळास जन्म
अन्‌ तिने विमानात दिला बाळास जन्म
Updated on

न्यूयॉर्क : सध्या जगभरात ओमिक्रॉनच्या (Omicron) बाधितांची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जगाच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान, विमान प्रवासादरम्यान (Flight Journey ) कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive) आलेल्या एका अमेरिकन महिला प्रवाशाला विमानाच्या बाथरूममध्ये (Quarantine In Bathroom) तीन तास क्वारंटाइन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही महिला शिकागोहून आइसलँडला प्रवास करत होती. याबाबत एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे. (Women Quarantined After Her Covid Test Positive During Mid Flight Journey )

अन्‌ तिने विमानात दिला बाळास जन्म
पुण्यात नववर्षानिमित्त वाहतुकीत बदल, 'या' भागात नो व्हेईकल झोन

डब्ल्यूएबीसी-टीव्हीच्या रिपोर्टनुसार, मिशिगनमधील शिक्षिका मारिसा फोटियो सांगितले की, 19 डिसेंबर रोजी प्रवासादरम्यान तिचा घसा दुखू लागला. त्यानंतर तिने फ्लाइटच्या (Flight) बाथरूममध्ये जाऊन रॅपिड कोविड (Rapid Covid Test) टेस्ट केली, ज्यामध्ये ती पॉझिटिव्ह आढळली. फोटियोने यांनी उड्डाण करण्यापूर्वी दोन पीसीआर टेस्ट आणि सुमारे पाच रॅपिड टेस्ट केल्या होत्या, त्या सर्व निगोटिव्ह आल्या होत्या. मात्र, फ्लाईटमध्ये या महिलेचा घसा दुखू लागल्याने तिने रॅपिड टेस्ट केली त्यात तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे या महिलेने कोरोनाच्या सर्व डोस पूर्ण केलेले आहेत. तसेच बूस्टर डोसदेखील घेतलेला आहे.

अन्‌ तिने विमानात दिला बाळास जन्म
देशात ओमिक्रॉनचे १७०० रुग्ण; महाराष्ट्रात 500 पेक्षा जास्त

दरम्यान, विमान त्याच्या ठरलेल्या ठिकाणी लँड झाले त्यावेळी या महिलेच्या कुटुंबियांना विमानातून सर्वात शेवटी खाली उतरविण्यात आले. तथापि, या महिलेच्या भावाला आणि वडिलांना कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने त्यांना त्यांच्या कनेक्टिंग फ्लाइटने स्वित्झर्लंडला जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, या महिलेची विमानतळावर ज्यावेळी पुन्हा रॅपिड आणि पीसीआर टेस्ट केली गेली त्यावेळी कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळळ्याने तिला एका हॉटेलमध्ये 10 दिवस क्वारंटाइन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.