TikTok Ban In USA: भारतानंतर आता अमेरिकेतही टिकटॉकवर येणार बंदी? 'या' व्हिडीओंवर घेतला अक्षेप

TikTok Ban: पालक कंपनी ‘बाइटडान्स’ने अमेरिकन वापरकर्त्यांबद्दलची संवेदनशील माहिती चीनमधील सर्व्हरवर हस्तांतरित केली.
TikTok Ban In USA: भारतानंतर आता अमेरिकेतही टिकटॉकवर येणार बंदी? 'या' व्हिडीओंवर घेतला अक्षेप
Updated on

TikTok Ban In USA Reasons: बंदूक नियंत्रण, गर्भपात आणि धर्म यासारख्या विभाजनकारी सामाजिक मुद्द्यांवर आधारित वापरकर्त्यांची माहिती गोळा करण्याचा आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने ‘टिकटॉक’ वर केला आहे.

टिकटॉकसंबंधीची लेखी माहिती सरकारी वकिलांनी मध्यवर्ती अपिलीय न्यायालयाकडे पाठविली आहे. टिकटॉक आणि चीनमधील तिची पालक कंपनी ‘बाइटडान्स’ने अमेरिकन वापरकर्त्यांबद्दलची संवेदनशील माहिती चीनमधील सर्व्हरवर हस्तांतरित केली.

TikTok Ban In USA: भारतानंतर आता अमेरिकेतही टिकटॉकवर येणार बंदी? 'या' व्हिडीओंवर घेतला अक्षेप
TikTok Ban: अमेरिकेत टिकटॉक मोजतेय शेवटची घटका! संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बंदीचे विधेयक मंजूर

यासाठी त्यांनी लार्क नावाच्या अंतर्गत प्रणालीचा वापर केला. टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांना बाइटडान्सच्या अभियंत्यांशी थेट संपर्क साधण्यासाठी या प्रणालीचा वापर होतो.

या प्रणालीद्वारे ‘टिकटॉक’च्या कर्मचाऱ्यांनी मिळविलेली अमेरिकेच्या वापरकर्त्यांची संवेदनशील माहिती चीनमधील ‘बाइटडान्स’च्या कर्मचाऱ्यांना सहज उपलब्ध होत असल्याचे वकिलांनी म्हटले आहे.माहितीमधील फेरफार आणि चीनच्या प्रभावाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

TikTok Ban In USA: भारतानंतर आता अमेरिकेतही टिकटॉकवर येणार बंदी? 'या' व्हिडीओंवर घेतला अक्षेप
TikTok Ban : टिकटॉकला आणखी एक दणका! आता ब्रिटननेही घातली बंदी

बाइटडान्स कंपनीशी संबंध तोडले नाही तर, अमेरिकेच्या कायद्यानुसार ‘टिकटॉक’वर काही महिन्यांची बंदी लागू केली जाऊ शकते. अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हा कायदा यावर्षी एप्रिलमध्ये लागू केला होता. माहितीचे हस्तांतर आणि काही शब्दांच्या आधारे ‘टिकटॉक’ने सामग्री दडपण्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सुनावणी सप्टेंबरमध्ये होणार आहे.

TikTok Ban In USA: भारतानंतर आता अमेरिकेतही टिकटॉकवर येणार बंदी? 'या' व्हिडीओंवर घेतला अक्षेप
TikTok Photo App : आता टिकटॉक आणणार फोटो शेअरिंग अ‍ॅप; इन्स्टाग्रामला देणार थेट टक्कर - रिपोर्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.