Imran Khan Arrested : इम्रान खान यांच्या अटकेनंतर समर्थकांचा राडा, लष्कराच्या मुख्यालयात जाळपोळ

Imran Khan Arrested
Imran Khan Arrested
Updated on

Imran Khan Arrested : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये समर्थकांनी राडा केला आहे. समर्थक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. आक्रमक समर्थकांनी लाहोरमधील लष्करी कमांडरच्या निवासस्थानात आणि रावळपिंडीतील लष्कराच्या मुख्यालयात प्रवेश केला आहे, पाकिस्तानमधील माध्यमांनी ही माहिती दिली आहे.

इम्रानचे समर्थकही लष्कराच्या मुख्यालयाबाहेर जमले आणि त्यांनी कॅम्पसमध्ये घुसण्यापूर्वी दगडफेक देखील केली आहे. लोकांनी या ठिकाणी बॅरिकेड्सही तोडले आहे. ष्कराच्या मुख्यालयावर हल्ला होण्याची ही पहिलीच घटना आहे. 

मागील वर्षी एप्रिलमध्ये अविश्वास ठरावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवण्यात आल्यानंतर खान यांना शंभरहून अधिक गुन्ह्यांशी जोडले गेले आहे. रशिया, चीन आणि अफगाणिस्तान बाबतच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या निर्णयांमुळे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील कट रचला गेला होता, असा त्यांच्यावर आरोप आहे.

लाहोरच्या कॅन्टोन्मेंट भागात एका लष्करी अधिकाऱ्याच्या घरी पीटीआय समर्थक घुसल्याचे वृत्त आहे. स्थानिक पत्रकारांनी ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार "पीटीआय समर्थक लाहोर  कॅन्टोन्मेंटमधील लष्करी अधिकाऱ्याच्या घरात घुसले."

Imran Khan Arrested
Imran Khan Arrested : भेटवस्तू विकून इम्रान खान यांनी 36 मिलियन्स कमावले; पाकिस्तानची जगात नाचक्की

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांनीही त्यांचे चेहरे अर्धवट झाकले आहेत. ते गेट तोडून आत शिरताना दिसत आहेत. कॅम्पसमध्ये लष्कराच्या गणवेशातील लोकही दिसत आहेत.

इम्रान यांच्या अटकेबाबत संपूर्ण पाकिस्तानात निदर्शने होत आहेत. अध्यक्ष डॉ मुहम्मद इक्बाल यांच्या नेतृत्वाखाली पीटीआय कार्यकर्ते रस्त्यावर एकत्र आले. पीटीआय समर्थकांनी टायर जाळून सिंधू महामार्ग देखील रोखला आहे.

Imran Khan Arrested
Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्येप्रकरणात मोठी अपडेट; 1 जूनपासून कोर्टात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.