कोणत्याही व्यक्तीवर एखादी शस्त्रक्रिया (Surgery) झाली की सुरुवातीचे काही दिवस त्यांना त्याचा त्रास जाणवत असतो. यात उठता-बसतांना, हालचाल करतांना वा बोलतांना थोडे कष्ट पडतात. परंतु, कधी शस्त्रक्रिया केल्यानंतर एखाद्या व्यक्तीची भाषा किंवा शब्दोच्चार बदलल्याचं ऐकलं आहे? अर्थात अनेकांचं उत्तर नाही असंच असेल. फारफार तर जीभ जड झाल्यामुळे बोलता न येण्याची समस्या निर्माण होत. परंतु, भाषा काही बदलत नाही. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) असा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिलेच्या टॉन्सिलवर (Tonsils Surgery) शस्त्रक्रिया केल्यानंतर तिची बोलीभाषा बदलली आहे. ही महिला अचानकपणे तिची मूळभाषा सोडून आयरिश पद्धतीने बोलू लागली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर याविषयी चर्चा रंगली आहे. (after tonsils surgery australian woman speaks irish accent instead-of australian accent-foreign accent syndrome)
'buzz.ie'च्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या जी. मॅकेन यांच्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची भाषा बदलली आहे. याविषयी मॅकेन यांनी एक व्हिडीओ शेअर करुन माहिती दिली आहे.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर ज्यावेळी मी पहिल्यांदा बोलले त्यावेळी मी चक्क आयरिश पद्धतीने शब्दोच्चार करत होते. सुरुवातीला हे स्वप्न असल्याचं समजून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु, पुढचे दोन दिवस निरीक्षण केल्यानंतर मी खरंच आयरिश शब्दोच्चार करत असल्याचं लक्षात आलं, असं तिने सांगितलं. या प्रकारानंतर डॉक्टरांनी तिला फॉरेन असेन्ट सिंड्रोम (Foreign Accent Syndrome)असल्याचं सांगितलं.
मेंदूला इजा पोहोचल्यानंतर फॉरेन असेन्ट सिंड्रोम (Foreign Accent Syndrome) हा आजार होतो. १९०७ मध्ये या आजाराचा शोध लागला असून तो दुर्मिळ आहे. आतापर्यंत याच्या केवळ १०० च्या आसपास केसेस सापडल्या असतील.
दरम्यान, मधल्या काळात मॅकेनने अनेक व्हिडीओ शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्येच मला पून्हा माझं जुनं आयुष्य जगायचं आहे असं तिने म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.