कोव्हॅक्सिनला मान्यता! मात्र, लसवंतांना 'या' तारखेपासून अमेरिकेत प्रवेश

Covaxin
CovaxinSakal
Updated on

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिनच्या (WHO) मान्यतेसंदर्भातील प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. कारण काल बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेने स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन उपयोगासाठी अखेर मंजुरी दिली आहे. अशा प्रकारे वैश्विक मान्यता मिळालेली कोव्हॅक्सिन (Covaxin) ही पहिली भारतीय लस ठरली आहे.

Covaxin
कोव्हॅक्सिनवर ‘डब्लूएचओ’ची मोहोर

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या या मान्यतेमुळे कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्या भारतीयांचा परदेश प्रवासाचा मार्ग सुकर होणार असून आरटीपीसीआर चाचणी अथवा विलगीकरण यासारख्या निर्बंधांना त्यांना तोंड द्यावे लागणार नाही. मात्र, या लसीची ही मान्यता तातडीने लागू होणार नाहीये.

कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली ही मान्यता येत्या 8 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. म्हणजेच कोव्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांनी परदेश प्रवासात सामोरे जावे लागणाऱ्या निर्बंधांपासूनची सुटका येत्या 8 नोव्हेंबरपासून मिळणार आहे. या लशीचे उत्पादन हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ या कंपनीने केले आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने कोव्हॅक्सिनला मान्यता दिली होती आता जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतर इतर देशांकडूनही या लसीला मान्यता मिळू शकेल.

Covaxin
''जनतेचा पैसा आधी कब्रिस्तानवर खर्च व्हायचा, आता मंदिरांवर होतो''

भारतात सुरुवातीच्या टप्प्यात प्रामुख्याने दोनच लसी उपलब्ध होत्या. अॅस्ट्राझेनेका कंपनीची कोव्हिशिल्ड आणि भारतीय बनवाटीची कोव्हॅक्सिन या दोन लसी होय. यातील अॅस्ट्राझेनेकाने तयार केलेली आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूटद्वारे उत्पादीत झालेली कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून सहजपणे मान्यता मिळाली होती. मात्र, संपूर्णपणे स्वदेशी असलेली लस कोव्हॅक्सिनला अद्याप तशी मान्यता मिळाली नव्हती. कोव्हॅक्सिनला ही मान्यता प्राप्त व्हावी, यासाठी भारत बायोटेकने जागतिक आरोग्य संघटनेकडे गेल्या एप्रिलमध्ये अर्ज केला होता. मात्र, प्रत्येकवेळी काही ना काही कारणास्तव ही मान्यता पुढे ढकलली जायची. आरोग्य संघटनेला आवश्यक असणारी माहिती जसे की, लसीची सुरक्षा, प्रभाव, चाचण्या याबाबतची तपशीलवार माहिती जुलैमध्ये देण्यात आली होती. तेव्हापासून या लसीला मान्यतेची प्रतिक्षा होती. अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक सल्लागार समितीने कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापरासाठी योग्य लशींच्या यादीत समावेश करण्यासाठी अतिरिक्त माहिती मागविली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.