नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एअर इंडियानं मोठं पाऊल उचललं असून रशियाकडं जाणारी थेट विमानसेवा बंद करण्यात आली आहे. आठवड्यातून दोन वेळा एअर इंडियाची फ्लाईट दिल्लीहून मॉस्कोकडे रवाना होत होती, ही सेवा १ एप्रिल २०२२ पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. (Air India suspends Russia nonstops no direct air connectivity between the two contries now)
१ एप्रिलपासून लागू होणार्या एअरलाइनच्या विमा कराराचं नुतनीकरण न झाल्यानं एअर इंडियाच्या विमानांना रशिया आणि युक्रेनमध्ये उतरण्यास आणि उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान, एअर इंडिया तसेच टाटा-एआयजीसह 5 ते 6 वेगवेगळ्या कंपन्या विमा कराराचं नुतनीकरण झाल्यानंतर आपल्या विमानांसाठी रशियन हवाई क्षेत्र पुन्हा सुरु करु शकतात, असंही काही जाणकारांनी म्हटलं आहे.
या कलमामुळं, शेवटचं दिल्ली-मॉस्को-दिल्ली उड्डाण 31 मार्च 2022 रोजी चालवण्यात आली होती आणि मुंबई-मॉस्को सुरू करण्याची योजना तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. युक्रेनमधील युद्ध संपल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी रशियाला जाणार्या विमानांचे संरक्षण पुन्हा सुरू केल्यावर आता उड्डाणे पुन्हा सुरू होतील.
एअर इंडियानं निवदेनद्वारे आपल्या प्रवाशांना सूचित केलं आहे. भारतीय विमान कंपनी एअर इंडियानं दिल्ली-मॉस्को-दिल्ली मार्गावरील तिकिटांची विक्री बंद केली आहे, या विमान कंपनीची रशियासाठी उड्डाणे पुन्हा सुरू होण्याची शक्यता सध्या अनिश्चित आहे. एअर इंडियाच्या कार्यालयाच्या माहितीनुसार, प्रवाशांना रद्द केलेल्या फ्लाइट्सचा संपूर्ण परतावा मिळण्याचा हक्क आहे, असं रशियन दूतावासानं आपल्या टेलिग्राम चॅनेलवर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, अशी माहिती सरकारी वृत्तसंस्था TASS नं दिली. तथापि, रशियन दूतावासाकडून सांगण्यात आलं की, प्रवाशांना ताश्कंद, इस्तंबूल, दुबई, अबू धाबी, दोहा आणि इतर मार्गाद्वारे दिल्लीहून मॉस्कोला जाता येऊ शकतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.