Air pollution : हवेच्या प्रदूषणामुळे एका वर्षात जगभरात ८१ लाख जणांचा मृत्यू; भारतातला आकडाही मोठा...

हवा प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांची संख्या भारतात सर्वाधिक आहे, हीही या अहवालातील काळजी करण्यासारखी बाब आहे. दक्षिण आशियात उच्च रक्तदाब, चुकीचा आहार आणि तंबाखूनंतर हवा प्रदूषण मृत्यूची जोखीम वाढविणारा घटक असल्याचेही अहवालात नमूद केले आहे.
Air pollution
Air pollutionesakal
Updated on

नवी दिल्लीः वाढत्या हवा प्रदूषणामुळे जगाचा श्वास कोंडत असून २०२१ मध्ये जगभरात त्यामुळे ८१ लाख जणांचा मृत्यू झाला. भारतातही प्रदूषित हवेने २१ लाख तर चीनमध्ये २३ लाख जणांचा बळी घेतला, असे एका नवीन आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आले आहे. ‘युनिसेफ’च्या भागीदारीतून हेल्थ इफेक्ट्‌स इन्स्टिट्यूट (एचईआय) या अमेरिकेतील संशोधन संस्थेने हा अहवाल नुकताच प्रकाशित केला.

हवा प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पाच वर्षांखालील मुलांची संख्या भारतात सर्वाधिक आहे, हीही या अहवालातील काळजी करण्यासारखी बाब आहे. दक्षिण आशियात उच्च रक्तदाब, चुकीचा आहार आणि तंबाखूनंतर हवा प्रदूषण मृत्यूची जोखीम वाढविणारा घटक असल्याचेही अहवालात नमूद केले आहे. २०२१ मध्ये जगात हवा प्रदूषणामुळे मागील वर्षीच्या अंदाजापेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. प्रत्येकी एक अब्जांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारत व चीनमध्येच प्रदूषित हवेमुळे ५४ टक्के जणांचा मृत्यू झाला आहे. हवेच्या पीएम २.५ या प्रदूषित कणांमुळे २०२१ मध्ये जगभरात एकूण मृत्यूपैकी १२ टक्के मृत्यू झाले. या वर्षी हवा प्रदूषणामुळे जगभरात ८१ लाख जणांनी प्राण गमावले. यापैकी ९० टक्क्यांहून अधिक म्हणजे ७८ लाख मृत्यूंना पीएम २.५ कण कारणीभूत आहेत. यात घरगुती हवा प्रदूषणातील पीएम २.५ कणांचाही समावेश आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

Air pollution
UGC-NET परीक्षा रद्द; परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने NTA चा मोठा निर्णय

जागतिक हवा प्रदूषणाची सद्य:स्थिती दर्शविणाऱ्या या अहवालामुळे माहिती उपलब्ध होण्याबरोबरच बदलासाठी प्रेरणा मिळेल, अशी आम्हाला आशा आहे. हवा प्रदूषणाचे आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. हवेचा दर्जा सुधारणे तसेच जागतिक सार्वजनिक आरोग्यात सुधारणा करणे व्यवहार्य असून ते शक्य आहे.

- एलिना क्राफ्ट, अध्यक्ष, एचईआय

पीएम २.५ कण धोकादायक का?

हवेतील २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यास असणारे कण पीएम२.५ म्हणून ओळखले जातात. त्यांचा आकार अतिशय सूक्ष्म असल्याने ते फुफ्फुसात राहतात आणि रक्तातही प्रवेश करू शकतात. या कणांमुळ मानवी शरीरातील अवयवांवर परिणाम होतो आणि प्रौढांमध्ये हृदयविकार, मधुमेह, फुफ्फुसांचा कर्करोग आदी आजारांचा धोका वाढतो.

जीवघेणे हवा प्रदूषण

सर्वाधिक मृत्यू होणारे देश

चीन : २३ लाख

भारत : २१ लाख

पाकिस्तान : २ लाख ५६ हजार

बांगलादेश : २ लाख ३६ हजार ३००

इंडोनेशिया : २ लाख २१ हजार ६००

नायजेरिया : २ लाख ६ हजार ७००

इजिप्त: १ लाख १६ हजार ५००

म्यानमार : १ लाख १ हजार ६००

पाच वर्षांखालील मृत्युमुखी मुले

भारत १,६९,४००

नायजेरिया १,१४,१००

पाकिस्तान ६८,१००

इथिओपिया ३१,१००

बांगलादेश १९, १००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com