जेरूसलेम : इस्त्राईलच्या सुरक्षा दलाने गाझामधील इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला ठार केले आहे. इराण पुरस्कृत पॅलेस्टाईनच्या या दहशतवादी संघटनेत व इस्त्राईलच्या सुरक्षादलात गेली अनेक वर्षे चकमक सुरू होती. अखेर हवाई हल्ला करून इस्लामिक जिहादच्या बाहा अबू अल् आता (वय 42) या कमांडरचा इस्त्राईलने खात्मा केला आहे. मागील 2 दिवस ही चकमक सुरू होती. यामुळे गाझा व इस्त्राईल दोन्ही ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे.
इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन हा संघर्ष जुना आहे. इस्त्राईलवर नेहमीच पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटनांनी हल्ले केलेले आहेत. याचाच बदला म्हणून इस्लामिक जिहादच्या कमांडरच्या थेट घरात घुसून त्याला ठार करण्यात आले आहे. यात त्याच्या पत्नीचा व मुलाचाही मृत्यू झाला आहे. सिरीयामधील डॅमॅस्कस येथील कमांडरच्या घरावर रॉकेट हल्ला करून त्याला ठार करण्यात आले आहे. यानंतर गाझामधील दहशतवादी संघटनेने इस्त्राईलवर हवाई हल्ला केला आहे.
इस्त्राईलने केलेल्या हल्ल्यात कमांडरसह इतर 10 सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. कमांडरच्या हत्येनंतर काही तासांतच इस्त्राईलच्या दक्षिण बाजूस गाझामधून हवाई हल्ला करण्यात आला. गाझाने केलेल्या या हल्ल्यात 25 इस्त्राईली नागरिक जखमी झाले आहेत. इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, 'अबु अल् आताने आतापर्यंत इस्त्राईलवर अनेक हल्ले केले आहेत. त्याचे प्रत्युत्तर म्हणून आम्ही त्याचा खात्मा केला. आम्हाला हे हल्ले वाढवायचे नाहीत, पण आमच्या सुरक्षेसाठी आम्ही काहीही करू शकतो.'
2014 मध्ये झालेल्या गाझा-इस्त्राईल युद्धानंतर हा तणाव शिगेला पोहोचला. तेव्हापासून पॅलेस्टाईनकडून नेहमीच काही ना काही कुरापती सुरू होत्या. कालच्या हल्ल्यानंतर इस्लामिक जिहादचा म्होरक्या खालीद अल् बश्त याने सांगितले की, 'या हल्ल्याचे प्रत्युत्तर आम्ही लवकरच देऊ. इस्त्राईलने गाझा व सिरीयामध्ये हल्ला करून युद्धाची हुलकावणी दिली आहे.'
या सर्व युद्धपरिस्थितीत भारत इस्त्राईलच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे. मोदी व नेतान्याहू यांचे मैत्रीपूर्ण संबंध पूर्ण देशाला माहीत आहेत. तसेच भारत व इस्त्राईल हे दोन्ही देश दहशतवादाने बेजार झाले आहेत, अशा परिस्थितीत भारताने इस्त्राईलला पाठिंबा देणे गरजेचे आहे. यामुळेच ट्विटरवर #IsraelUnderFire, #IsraelUnderAttack व #IndiaWithIsrael हे हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत व सगळीकडून इस्त्राईल सुरक्षित राहावे यासाठी प्रार्थना केली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.