America News : अमेरिकेत दोषीला नायट्रोजनद्वारे मृत्युदंड; शिक्षेवर मानवाधिकार आयोगाचा आक्षेप

गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला जातो. मात्र अमेरिकेत एका गुन्हेगारास नायट्रोजनचा गॅस हुंगायला लावून त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली.
america accused punishment till death by nitrogen gas human rights objection
america accused punishment till death by nitrogen gas human rights objectionSakal
Updated on

वॉशिंग्टन : गुन्हेगाराला मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला जातो. मात्र अमेरिकेत एका गुन्हेगारास नायट्रोजनचा गॅस हुंगायला लावून त्याला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. केनेथ युजिन स्मिथ असे गुन्हेगाराचे नाव आहे.

अलाबामा प्रांतात मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली असून स्मिथला फेस मास्कस्वारे नायट्रोजन हुंगायला लावले आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या शिक्षेवर मानवाधिकार आयोगाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

अलाबामाचे ॲटर्नी जनरल स्टीव्ह मार्शल यांनी या शिक्षेचे समर्थन केले आहे. केनेथ युजिन स्मिथला १९८८ मध्ये एलिझाबेथ सेनेट हत्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

याप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर गुरुवारी रात्री नायट्रोजन गॅसचा वापर करत शिक्षा देण्यात आली. पाच पत्रकारांनी डोळ्यादेखत ही शिक्षा पाहिली आणि त्यांचा संदर्भ देत ‘एपी’ने वृत्त प्रकाशित केले आहे. शिक्षेच्या वेळी पाच पत्रकार, स्मिथचे धार्मिक गुरू,

त्याचे वकील आणि त्याचे कुटुंबीय हजर होते. गुरुवारी सायंकाळी ७.५६ वाजता शिक्षा देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर चेंबरमध्ये एक अधिकारी आला आणि त्याने मास्कची तपासणी केली. त्यानंतर स्मिथच्या मास्कमध्ये नायट्रोजन सोडले. तो जीवाच्या आकांताने तडफडू लागला.

ते दृश्‍य भयावह होते. ८.०८ वाजता त्याचा श्‍वास थांबल्याचे वाटले. पण मास्कची तपासणी केल्यानंतर पुन्हा नायट्रोजन सोडण्यात आले. रात्री ८.२५ वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.