शिकागोत चक्क आगीच्या लोटातून धावतायेत रेल्वेगाड्या; जाणून घ्या सत्य

अमेरिकेत चक्क ट्रॅकवर आगीतून धावतेय रेल्वे
Railway
RailwayEsakal
Updated on

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात आगीच्या लोटातून रेल्वे जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटेल की, गाडीला आग लागली आहे. मात्र हे खर नसून थंडीच्या लाटेपासून बचाव करणारी यंत्रणा अमेरिकेत (America) उभी केली आहे. नेमकी काय आहे ही यंत्रणा जाणून घेऊया.

सध्या जगभरात थंडीची लाट (Cold wave)उसळली आहे. बर्फवृष्टीमुळे प्रवास करणे तसेच घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील शिकागोत(Chicago) थंडीची लाट उसळली आहे. रेल्वेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी एका रेल्वे सेवा चालवणाऱ्या कंपनीने रेल्वे ट्रॅकला आग लावली आहे. ज्यामुळे शून्य तापमान असतानाही ट्रेन चालू राहतील आणि प्रवास करता येईल. ट्रान्सपोर्ट ऑपरेटर मेट्रा (Metra) ही आग लावण्याचे काम करते.

काय हिटिंग सिस्टम आहे पध्दत

कंपनीने कोल्ड ट्रॅक गरम करण्यासाठी ट्यूबलर हिटिंग सिस्टम आणि हॉट एअर ब्लोअरचा वापर केला आहे. या पध्दतीचा वापर तापमान १ सेल्सीअंशच्या खाली असताना केला जातो. यामुळे रेल्वे ट्रॅक गोठत नाही. ही आग रुळाच्या बाजूने लावली जाते. ज्याचा रेल्वेवर कोणताही परीणाम होत नाही. बर्फवृष्टीमुळे रेल्वेमार्गावरील स्विच पॉइंट्स देखील गोठले जाऊ शकतात. ते अनक्लोग करण्यासाठी हिटिंग सिस्टमचा वापर केला जातो. हिटिंग सिस्टम जेव्हा सुरु असते तेव्हा यावर चालक लक्ष ठेऊन असतो. मेट्राने आधी सीएनएनला याची कल्पना दिली आहे की, रेल्वे गाड्या या डिझेल इंधनवर चालतात. बाहेरील आगीचा याला धोका नाही होऊ शकत.

रेल्वे होऊ शकते विभक्त

अती थंडीमुळे ट्रॅकवर दोन प्रकारे परिणाम होऊ शकतात. एक म्हणजे पुल-अप आणि दुसरा म्हणजे पॉइंट्स. थंडीत धातू आकुंचन पावतात आणि रेल्वे आपोआप बाजूला होतात. याने अपघात होऊ शकतो. तसेच रेल्वे रुळावरील पॉइंट्स गोठू शकतात. हे होऊ नये म्हणून मेट्रा फोर्सेस हीटिंग सिस्टमचा वापर करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.