Plane Crash : फ्लोरिडाच्या गल्फ कोस्टजवळ विमान कोसळलं; दुर्घटनेत दोन महिलांसह 4 जण ठार

विमान अपघातात ठार झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
Plane Crash
Plane Crashesakal
Updated on
Summary

डिसेंबरमध्ये व्हेनिसजवळ अशाच अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. मात्र, पोलीस अधिकाऱ्यानं ही घटना असामान्य असल्याचं म्हटलं.

व्हेनिस : फ्लोरिडाच्या गल्फ कोस्टजवळ (Florida Gulf Coast) गुरुवारी एक विमान (Plane Crash) कोसळलं. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिलीये.

विमान अपघातात ठार झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सध्या पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विमानानं व्हेनिस विमानतळावरून उड्डाण केलं होतं आणि पश्चिमेकडील मेक्सिकोच्या आखातात ते कोसळलं. व्हेनिसचे पोलीस (Venice Police) अधिकारी अँडी लीसेनरिंग यांनी सांगितलं की, 'घटनास्थळी उपस्थित लोकांनी 911 वर कॉल करून विमान अपघाताची माहिती दिली.'

Plane Crash
Karnataka Election : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर; 3 भाजप, एक JDS बंडखोरांसह 42 उमेदवारांना दिलं तिकीट

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी

पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, विमानतळावर उपलब्ध असलेले व्हिडिओ फुटेज आणि अपघातस्थळाचा आढावा घेतला जाईल. नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या प्रकरणाची चौकशी करत असून व्हिडिओ फुटेज त्यांच्याकडं सोपवण्यात आले आहेत.

Plane Crash
Karnataka Politics : CM पदाचे दावेदार असणाऱ्या सिद्धरामय्यांना काँग्रेस देणार मोठा धक्का? 'या' जागेचं कापणार तिकीट!

ते पुढं म्हणाले, दुपारी काही वेळापूर्वी पाईपर PA-32R विमान सुमारे 23 फूट पाण्याखाली दिसलं. विमान अपघातात ठार झालेल्या चौघांची ओळख पटली आहे. विल्यम जेफ्री लम्पकिन (64), पॅट्रिशिया लम्पकिन (68), रिकी जो बीव्हर (60), एलिझाबेथ अॅनी बीव्हर (57) अशी पीडितांची नावं आहेत.

व्हेनिस हे सेंट पीटर्सबर्गच्या दक्षिणेस 58 मैल (93 किमी) अंतरावर फ्लोरिडाच्या गल्फ कोस्टवर स्थित आहे. डिसेंबरमध्ये व्हेनिसजवळ अशाच अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. मात्र, पोलीस अधिकाऱ्यानं ही घटना असामान्य असल्याचं म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.