बायडेन आडनाव अन् भारत कनेक्शन

Joe Biden
Joe Bidenesakal
Updated on
Summary

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी (ता. 24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पहिल्याच भेटीत संभाव्य 'इंडिया कनेक्शन'बद्दल काही 'खुलासे' केले.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी (ता. 24) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पहिल्याच भेटीत संभाव्य 'इंडिया कनेक्शन'बद्दल काही 'खुलासे' केले. बायडन यांनी मोदींना त्यांच्या आडनावाबाबत एक 'किस्सा' सांगितला आणि हा किस्सा ऐकून खुद्द मोदीही अवाक् झाले. एका व्यक्तीबद्दल घडलेल्या घटनेची आठवण सांगताना बायडन म्हणाले, 1972 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा सिनेटर म्हणून निवडून आलो, तेव्हा मला भारतातल्या एका व्यक्तीनं पत्र लिहिलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

बायडन यांनी मोदींना 2013 मध्ये अमेरिकेचा उपराष्ट्रपती असताना मुंबईत असल्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, मला विचारण्यात आलं.. भारतात कोणी तुमचे नातेवाईक आहेत का? यावर बायडन म्हणाले, मला याबद्दल कल्पना नाही. पण, जेव्हा मी वयाच्या 29 व्या वर्षी 1972 मध्ये पहिल्यांदा निवडून आलो, तेव्हा मला 'बायडन' आडनाव असलेल्या व्यक्तीकडून मुंबईतून एक पत्र मिळालं, असं त्यांनी आवर्जुन सांगितलं.

Joe Biden
UPSC परीक्षेत देशात 'टॉप' आलेल्या शुभमनं सांगितलं यशाचं Secret

तद्नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी एका पत्रकारानं बायडन यांना सांगितलं, आमच्या भारतात पाच बायडेन आहेत. हा किस्सा ऐकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरलं नाही. इस्ट इंडिया (टी) कंपनीमध्ये एक कॅप्टन जॉर्ज बायडन होते, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. येथेच त्याने एका भारतीय महिलेशी लग्न केलं आणि संसार थाटला. मी त्याला कधीच शोधू शकलो नाही, असंही त्यांनी मिश्किलपणे कबुल केलं. त्यानंतर तुमच्या नेतृत्वात भारत आणि अमेरिका यांच्यातील चांगल्या संबंधांच्या विस्ताराची बीज रोवली गेली आहेत, असं म्हणत बायडेन यांनी मोदींचंही कौतुक केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.