टंडन यांना धोरण आणि व्यवस्थापनाचा दोन दशकांचा अनुभव आहे.
वॉशिंग्टन (अमेरिका) : भारतीय वंशाच्या नीरा टंडन (Neera Tanden) यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी व्हाइट हाऊस स्टाफ सेक्रेटरी (White House staff secretary) म्हणून नियुक्ती केलीय. या नियुक्तीनंतर टंडन यांना एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलीय. त्या अंतर्गत टंडन ह्या अध्यक्ष बायडन यांच्या सर्व कागदपत्रांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करतील. हे पद भूषवणाऱ्या नीरा टंडन या पहिल्या भारतीय-अमेरिकन (First Indian-American) आहेत. यापूर्वी मे महिन्यात नीरा यांची वरिष्ठ सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.
व्हाइट हाऊसचे कर्मचारी, सचिव जरी पडद्यामागं राहून काम करत असले, तरी त्यांची भूमिका खूपच महत्त्वाची असते. एका अधिकाऱ्यानं सांगितलं, की व्हाइट हाऊसमधील स्टाफ सेक्रेटरीची भूमिका केंद्रीय संस्थेसारखीच आहे, जी शासनाच्या धोरणांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करते, शिवाय अध्यक्षांसाठी विविध समस्यांचं व्यवस्थापन देखील करत असते. वॉशिंग्टन पोस्टच्या म्हणण्यानुसार, टंडन ह्या व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ रोनाल्ड क्लेन यांना अहवाल देतील.
टंडन यांना धोरण आणि व्यवस्थापनाचा दोन दशकांचा अनुभव आहे. त्यामुळं व्हाइट हाऊसमधील धोरण आणखी मजबूत होणार आहे. देशांतर्गत आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरणातील त्यांचा अनुभव या नव्या भूमिकेत महत्त्वाचा ठरणार आहे. टंडन यांनी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. याशिवाय, टंडन यांनी अमेरिकेच्या आरोग्य मंत्रालयात देखील वरिष्ठ सल्लागार म्हणून आपली भूमिका बजावलीय. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात देखील त्यांनी काम केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.