अमेरिकेकडून भारताला मोठी ऑफर, पंतप्रधान मोदी घेणार का पुढाकार?

भारताची भूमिका काय असेल ?
PM Narendra Modi And Russian President Vladimir Putin
PM Narendra Modi And Russian President Vladimir Putin esakal
Updated on

दिल्ली : युक्रेन संकटावर भारताने पाश्चात्त्य देशांनी वारंवार केलेल्या आवाहनानंतरही रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांचे निषेध केलेला नाही. भारताच्या या भूमिकेमागे मोठ्या प्रमाणावर संरक्षण सामग्रीसाठी रशियावर (Russia) असलेले अवलंबन हे ही एक मोठे कारण आहे. अमेरिकेलाही हे कारण माहीत आहे. आता या देशाने भारताला मोठी ऑफर दिली आहे. अमेरिकेने (America) रशियने शस्त्रास्रांवर टीका करत म्हटले आहे, की भारताबरोबर संरक्षण क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक आहे. भारताला विचार करावे लागेल की शस्त्रास्त्रांसाठी रशियावर अवलंबून राहणे योग्य आहे का? असे अमेरिकेने म्हटले आहे. (America Offer Defense Supply To India)

PM Narendra Modi And Russian President Vladimir Putin
व्लादिमीर पुतीन यांना विष देऊन मारण्याचा कट, १००० कर्मचाऱ्यांना केले बडतर्फ

रशियाचे जवळपास ६० टक्के मिसाईल्स काम करण्याच्या स्थितीत नाहीत. अमेरिकेने भारताला (India) सांगितले, की रशियाचे शस्त्रास्त्रे युद्धात किती खराब कामगिरी करित आहेत.

अमेरिका देणार भारताला शस्त्रास्त्रे

राजकीय विषयावर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव व्हिक्टोरिया नुलँड यांनी बुधवारी (ता.२३) द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सदरील माहिती दिली. त्या म्हणाल्या, की रशिया-युक्रेन युद्धावरुन त्यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्याशी चर्चा केली आहे. अमेरिका भारताला संरक्षण सज्जतेसाठी रशियावरील अवलंबन कमी करण्यासाठी मदतीला तयार आहे.

PM Narendra Modi And Russian President Vladimir Putin
रशियन तेलावर बंदी घालताना कच खातेय अमेरिका; कारण देताना म्हटलं...

रशिया-चीन संबंध भारत-अमेरिकेसाठी योग्य नाही

रशिया-चीन संबंधांचा उल्लेख करित नुलँड म्हणाल्या, की युक्रेनवर सुरु असलेल्या युद्धा दरम्यान रशियाने चीनकडे मदत मागितली आहे. तो चीनकडून पैसे आणि शस्त्रास्त्रांचीही मदत मागत आहे. यामुळे रशिया आणि चीनचे संबंध मजबूत होत आहेत. आमच्यासह ते भारतासाठी हिताचे नाही. रशिया रसायन आणि जैविक शस्त्रांबाबत बेजबाबदार वक्तव्य करित आहे. यामुळे अतिरेकी शक्ती एक होत आहे. भारत आणि अमेरिकेसारख्या लोकशाही देशांसाठी आवश्यक आहे की त्यांनी एकमेकांबरोबर उभे राहावे. व्हिक्टोरिया नुलँड म्हणाल्या, की अमेरिकेला माहित आहे, की भारत-रशिया दरम्यान ऐतिहासिक संबंध राहिले आहेत. मात्र युक्रेन-रशियाच्या मुद्द्यावर आपण एकमेकांबरोबर उभे राहायला हवे. आता वेळ आली आहे, की आम्ही भारताबरोबर संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक सहकार्य करण्यास उत्सुक आहोत. अमेरिका, आमचे युरोपीय सहकार्य आणि भागीदारही असे करण्यास उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.