US Presidential Debate: बायडन - डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील अध्यक्षीय वादविवाद; इस्रायल, युक्रेन युद्धासह अर्थव्यवस्था-हवामानावर या विषयांवर झाली चर्चा

US Presidential Debate: जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदावरून चर्चासत्रात सुरू झाले आहे. या काळात रशिया-युक्रेन युद्धासह अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.
US Presidential Debate
US Presidential DebateEsakal
Updated on

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक सुरू झाली आहे. या निवडणुकीदरम्यान होणाऱ्या अध्यक्षीय चर्चेत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जोरदार वादविवाद झाला. देश आणि जगाशी संबंधित विविध मुद्द्यांवर दोघांमध्ये वाद-विवाद होताना दिसत आहेत. ज्यामध्ये अर्थव्यवस्था, हवामान, इस्रायल, युक्रेन, अफगाणिस्तान यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

अमेरिकन निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष जो बायडन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अध्यक्षपदावरून वादविवाद सुरू झाला आहे. दोघांमधील चर्चेदरम्यान ट्रम्प म्हणाले की, बायडन यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी काहीही केले नाही. प्रत्यक्षात मात्र त्यांनी युद्ध थांबवण्याऐवजी ते वाढवण्याचे काम केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे.

US Presidential Debate
US Presidential Debate 2024: एकाचा पाठिंबा तर एकाने म्हटलं भयंकर... गर्भपाताचा मुद्दा ठरवणार अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष!

ट्रम्प यांना प्रत्युत्तर देताना बायडन म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युद्ध गुन्हेगार आहेत आणि त्यांना रशियाला सोव्हिएत समाजात बदलायचे आहे. जे वास्तव असणार नाही. ट्रम्प पुढे म्हणाले की, ते देशाचे राष्ट्राध्यक्ष असते तर हे युद्ध कधीच झाले नसते. याशिवाय इस्रायलच्या समर्थनार्थ पैशांबाबतही ट्रम्प यांनी प्रश्न विचारले आहे.

US Presidential Debate
Antoni Blinkin : भारतात अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याची स्थिती चिंताजनक; अँटोनी ब्लिंकन यांचा आरोप

चर्चेदरम्यान जो बायडन यांनी पॅरिस शांतता कराराचे कौतुक केले आहे. यावेळी ट्रम्प यांना त्यांचा कार्यकाळ आठवला. आपल्या कार्यकाळात पर्यावरणाची स्थिती अतिशय चांगली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. पॅरिस शांतता कराराबद्दल ट्रम्प म्हणाले की, यासाठी अमेरिकेला एक दशलक्ष डॉलर्सची किंमत मोजावी लागली तर भारतासारख्या देशांना काहीही द्यावे लागले नाही.

US Presidential Debate
Antoni Blinkin : भारतात अल्पसंख्याकांच्या स्वातंत्र्याची स्थिती चिंताजनक; अँटोनी ब्लिंकन यांचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.