अमेरिकेतही पोचला ओमिक्रॉन; प्रवासावरील निर्बंधाने गुटरेस नाराज

द. आफ्रिकेत चोवीस तासात ओमिक्रॉनचे रुग्ण दुप्पट
अमेरिकेतही पोचला ओमिक्रॉन; प्रवासावरील निर्बंधाने गुटरेस नाराज
अमेरिकेतही पोचला ओमिक्रॉन; प्रवासावरील निर्बंधाने गुटरेस नाराज
Updated on

जोहान्सबर्ग/वॉशिंग्टन : दक्षिण आफ्रिकेत एका दिवसात कोरोनाचे रुग्ण दुपटीने वाढले आहे. काल सायंकाळी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसिजने सांगितले, की गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ८५६१ रुग्ण आढळले. तत्पूर्वीच्या चोवीस तासात ही संख्या ४३७३ होती. दरम्यान, अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात बुधवारी ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळून आला आहे.

चोवीस तासात रुग्ण वाढल्याने दक्षिण आफ्रिकेत सरकारवर लसीबाबतचे नियम आणखी कडक करण्याबाबत दबाव वाढला आहे. चोवीस तासात साडेआठ हजार रुग्ण वाढीबरोबरच २८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लस न घेतलेल्या लोकांच्या संचारावर मर्यादा आणाव्यात, असे आरोग्य खात्याने सुचविले आहे. या आधारावर लस न घेतलेल्यांची माहिती गोळा करणे सोपे जाईल, असे खात्याचे म्हणणे आहे. दक्षिण आफ्रिकेच्या तज्ञांनी ओमिक्रॉन संसर्गाला किरकोळ समजणे घाईचे ठरेल, असे म्हटले आहे. ओमिक्रॉनच्या परिणामाबाबत अद्याप निष्कर्ष समोर आलेले नाहीत. सध्या रोगप्रतिकारक शक्ती सक्षम असतानाही तरुण पिढीला ओमिक्रॉनची लागण होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, मुले आणि आजारी लोकांवर ओमिक्रॉनचा परिणाम कसा होईल याबाबत ठोस सांगता येत नसल्याचे तज्ञ म्हणतात. तसेच पश्‍चिम आफ्रिकी देश नायजेरियातही ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. नायजेरिया सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घातले आहेत. कोरोना प्रतिबंधक लस निर्माते बायोएनटेकचे सीईओ उगूर साहिन यांनी म्हटले की, ओमिक्रॉन व्हेरिएंटची लसवंत लोकांनाही बाधा होऊ शकते. अर्थात ते गंभीर होणार नाहीत.

दक्षिण आफ्रिकेपूर्वी लंडन येथे होता ओमिक्रॉन

ओमिक्रॉनमुळे जगभरात खळबळ माजली आहे. आफ्रिकेत ओमिक्रॉन आढळून आल्यानंतर या संसर्गाला बोट्स्वाना व्हेरिएंट असे म्हटले जात होते. परंतु हा व्हेरिएंट आफ्रिकेत आढळून येण्यापूर्वी लंडनमध्ये होता, असा दावा आफ्रिकी डॉक्टरांनी केला आहे. इस्त्राईलच्या तेल अवीवच्या शेबा मेडिकल कॉलेजचे डॉ. एलाड माओर यांनी लंडन येथे ओमिक्रॉनचे अस्तित्व आफ्रिकेत आढळून येण्यापूर्वीच होते, असे म्हटले आहे. १९ नोव्हेंबरला डॉ. माओर हे परिसंवादासाठी लंडनला गेले होते. तेथे १२०० आरोग्य तज्ञ जमले होते. २३ नोव्हेंबरला घरी आल्यानंतर काही दिवसांत त्यांना लक्षणे दिसू लागले. २७ नोव्हेंबरला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या संसर्गाची बाधा लंडनमध्येच झाली, असा दावा केला.

प्रवासावर बंदी घालून उपयोग नाही: यूएन

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ॲन्टानिओ गुटरेस यांनी म्हटले की, प्रवासावर बंदी घालणे चुकीचे आणि गैर आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर काही देशांनाच लक्ष्य केले जात आहे. चाचणी वाढवण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. या व्हायरसला कोणतीही मर्यादा नसून तो प्रवासावर बंधने घालून थांबणारा नाही, असेही ते म्हणाले. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आल्यानंतर दहा-बारा देशांनी आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी घातली आहे.

कॅलिफोर्नियात एंट्री

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा अमेरिकेत प्रवेश झाला आहे. जगभरात वेगाने पसरणाऱ्या या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण हा कॅलिफोर्नियात आढळून आला आहे. काल रात्री अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंधक विभागाने यासंदर्भातील माहिती दिली. बाधित व्यक्ती २२ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून परतला होता. त्याने दोन्ही डोस घेतले होते. किरकोळ लक्षणे जाणवू लागल्याने त्याने स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवले. त्याची चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.